मुंबई : महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. फार त्रास नाही. त्यामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा व क्वारंटाईनचा सल्ला दिला आहे, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
मंत्रालयात आत्तापर्यंत कॅबिनेट व राज्यमंत्री दर्जाच्या १४ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातून ते बरे झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर सचिवांना व कर्मचारी- अधिकाऱ्यांनाही लागण झाली आहे. मंत्रालयातील उपस्थिती एक आॅक्टोबरपासून वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे देखील कर्मचारी- अधिकारी संघटनेमध्ये सुरक्षेच्या मुद्यावरून नाराजी आहे.