आंब्यावरील कोरोना संकट टळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 07:20 AM2020-04-11T07:20:06+5:302020-04-11T07:20:23+5:30

कोकणचा राजा थेट गृहनिर्माण संकुलांत; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

corona crisis on mangoes will be avoided | आंब्यावरील कोरोना संकट टळणार

आंब्यावरील कोरोना संकट टळणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे आंब्याचा हंगामही धोक्यात आला असला तरी शेतातून थेट सोसायट्यांमध्ये आंबा दाखल करण्याच्या प्रयत्नांना उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या तीन दिवसांत रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातून तब्बल ३२ हजार डझन आंबा शहरी भागातल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये दाखल झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आंब्याचे दर २५ ते ३० टक्क्यांनी कमी असून ग्राहक आणि आंबा उत्पादकांचाही त्यातून फायदा होत आहे.
लॉकडाऊनमुळे आंब्याला भाव मिळणार नाही त्यामुळे एपीएमसीत आंबा पाठवू नका, अशा सूचना बाजारातून मिळू लागल्यानंतर शेतकरी हवालदिल झाले होते. कोकणातील शेतकºयाचे आंबा हे एकमेव नगदी पिक आहे. ऐन हंगामात कोसळलेल्या संकटामुळे शेतकरी उध्वस्त होण्याची भीती होती. त्यामुळे रत्नागिरी कृषी विभागाने उपनिबंधक कार्यालयाच्या (डीडीआर) सहकार्याने थेट सोसायट्यांत आंबा विक्रीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. कृषी विभागाने सिधूदुर्ग रत्नागिरीतून आंबा पाठविण्यासाठी नियोजन केले. सोसायटीने मागणीनुसार एकत्रित आंब्याची आॅर्डर शेतकऱ्यांना द्यायची. शेतकºयांनी तो आंबा सोसायटीपर्यंत पोहचवायचा आणि सोसायटीने थेट शेतकºयांच्या बँक खात्यांवर पैसे जमा करायचे अशी ही योजना आहे.


आम्ही त्या दोघांमधला दूवा म्हणून कार्यरत असल्याचे कृषी विभागाचे सहसंचालक विकास पाटील यांनी सांगितले. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता येत्या आठवड्याभरात हजारो डझन आंबा घराघरांत दाखल होईल. त्यातून आंबा उत्पादक शेतकºयांवरील संकट टळेल, असा विश्वासही कृषी अधिका-यांनी व्यक्त केला.
किंमत किमान २५ टक्क्यांनी कमी
ठाण्यातील दोस्ती विहार या गृहसंकुलात शुक्रवारी तब्बल तीन हजार डझन म्हणजेच ७५० पेट्या आंबा दाखल झाला. प्रत्येक पेटीत साधारणत: २२५ ते २५० ग्रॅम वजनाचा एक याप्रमाणे चार डझन आंबा आहे. त्याचा दर ३५० रुपये आहे. कोरोनाचे संकट नसते तर हाच आंबा ग्राहकांना किमान ५०० ते ५५० रुपयांना मिळाला असता. मात्र, या उपक्रमामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघांचाही फायदा झाल्याचे दोस्ती विहार फेडरेशनचे राजेंद्र देशमुख आणि गिरीश म्हात्रे यांनी सांगितले.

Web Title: corona crisis on mangoes will be avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.