मुंबईत कोविड मृतांचा आकडा ६० ते ६९ वयोगटात अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 07:55 PM2021-05-15T19:55:24+5:302021-05-15T19:55:47+5:30
मुंबई - कोविड १९ मुळे आतापर्यंत १४ हजार दोनशे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण ३० ते ५० या वयोगटात अधिक असल्याने गेल्या वर्षभरात दिसून आले आहे.
मुंबई - कोविड १९ मुळे आतापर्यंत १४ हजार दोनशे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण ३० ते ५० या वयोगटात अधिक असल्याने गेल्या वर्षभरात दिसून आले आहे. मात्र ६० ते ६९. या वयोगटात एकूण मृत्यूंच्या प्रमाणात २७ टक्के मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत या वयोगटातील ३९७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. एप्रिल महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले होते. सुरुवातीच्या काळात विलगीकरणाच्या भीतीने तसेच या आजाराबाबत पुरेशी माहिती नसल्याने रुग्ण वेळेत उपचार घेत नव्हते. मात्र महापालिकेने कोविड मृत्यू मागचे कारण शोधून आवश्यक उपाय योजना सुरू केल्या. त्याचे चांगले परिणाम दिसून येत मृतांचा आकडा नियंत्रणात आला. सध्या मुंबईतील आतापर्यंतचा सरासरी मृत्यू दर दोन टक्के आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. दररोज ६० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू येत आहे. शनिवारी दैनंदिन मृत्यू दर ४.२८ टक्के एवढा होता. मृतांमध्ये ६० ते ६९ या वयोगटात सर्वाधिक मृत्यू दिसून आले आहेत. त्या पाठोपाठ ७० ते ७९ या वयोगटात ३३३७ मृत्यू तर ५० ते ५९ या वयोगटात ३००८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
० ते १९ वयोगटात संसर्ग कमी.....
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र दुसऱ्या लाटे म्हणतात आता ० ते १० या वयोगटात ११ हजार ६४६ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १७ मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच १० ते १९ या वयोगटात २९ हजार ९५५ मुलांना कोरोना झाला असून ३४ मुलांचा मृत्यू झाला आहे.
वयोगट...बाधित रुग्ण ....मृत्यू
० ते ९....११६४६....१७
१० ते १९....२९९५५....३४
२० ते २९...१०२९३९...१३८
३० ते ३९...१२९५०७....४५४
४० ते ४९....११७५११....१३१८
५० ते ५९....११४९२०....३००८
६० ते ६९...८११९५...३९७३
७० ते ७९...४४१९०...३३३७
८० ते ८९...१५५६२...१६४०
९० हून अधिक....२४६२...२१६