कोरोना : रुग्णांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जाते आहे आर्सेनिक औषध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 04:21 PM2020-05-27T16:21:59+5:302020-05-27T16:56:55+5:30

२२ हजार पोलीस, ४ हजार अग्निशमन दलाचे जवान आणि २ हजार धारावीकरांना औषंधाचे मोफत वितरण

Corona is dying: Mumbai doctor developed homeopathic medicine with the help of 100 doctors from all over the world | कोरोना : रुग्णांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जाते आहे आर्सेनिक औषध

कोरोना : रुग्णांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जाते आहे आर्सेनिक औषध

googlenewsNext



मुंबई : गेल्या ४० वर्षांपासून मुंबईत कार्यरत असलेले होमिओपॅथी डॉक्टर जवाहर शाहा यांनी जगभरातील १०० डॉक्टरांच्या मदतीने होमिओपॅथी औषधांचे एक किट तयार केले असून, विकसित करण्यात आलेल्या या होमिओपॅथी औषधाचे आतापर्यंत २२ हजार पोलीस, ४ हजार अग्निशमन दलाचे जवान, धारावीमध्ये राहत असलेले २ हजार नागरिक; अशा एक लाखांहून अधिक नागरिकांना मोफत वितरण करण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे होमिओपॅथी औषधामुळे नागरिकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होत असून, कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असतानाच नवे रुग्णही आढळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

अवघे जग कोरोनाला हरविण्यासाठी लस शोधत आहे. मात्र अद्यापही कोणत्याच देशाला म्हणावे तसे यश आलले नाही. याच देशात भारताचाही समावेश असून, भारतात कोरोनाना हरविण्यासाठी होमिओपॅथीचा वापर केला जात आहे. होमिओपॅथीच्या मदतीने नागरिकांमधील रोगप्रतिकारक क्षमता वाढवितानाच त्यांना आरोग्यदृष्टया सुदृढ केले जात आहे. याद्वारे कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असून, नवे रुग्णही आढळत नसल्याचा दावा केला जात आहे. होमिओपॅथीच्या मदतीने नागरिकांमधील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासह त्यांना आरोग्य दृष्टया मजबूत केले जात आहे. विशेषत: या औषधांच्या मदतीने कोरोनाबाधितांना बरे केले जात असून, या औषधांचा प्रभावी वापर करत नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. दरम्यान, शाह यांनी जगभरातील १०० डॉक्टरांच्या मदतीने तयार केलेले होमिओपॅथी औषध नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. शिवाय त्यामुळे कोणताच आजार नागरिकांजवळ फिरकत नाही. विशेषत: आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, हे औषध तयार करण्यात आले आहे.
 

 



टास्क फोर्स

महाराष्ट्र सरकारने कोरोनोसोबत लढण्यासाठी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांची एक टिम स्थापन केली आहे. या टास्क फोर्समध्ये डॉ. जवाहर शाह यांचा समावेश आहे. ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे नाहीत. मात्र त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. अशा नागरिकांचे समुपदेशन करणे. शिवाय ज्यांमध्ये लक्षणे आढळत आहेत. मात्र त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह नाही. अशांनाही हा फोर्स मार्गदर्शन करत आहे.  

 



सद्यस्थितीमध्ये नागरिक एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी मोठया प्रमाणावर स्थलांतरण करत आहेत. त्यामुळे त्यांनाही हे औषध दिले जावे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. हे औषध नाममात्र पंधरा ते वीस रुपयांत उपलब्ध होत आहे. आपल्या देशात अशाही नागरिकांची संख्या मोठी आहे; ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नाहीत. मात्र तरिही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. शिवाय मृत्यू दराचे प्रमाण देखील कमी आहे. परिणामी नागरिकांमधील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी हे औषध उपयोगी आहे.

- डॉ. जवाहर शाह
 

 

  •  आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित आर्सेनिक अल्बम आणि कॅ म्फर एम वन याचा या औषधांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
  •  विदेशातही या औषधाला मागणी आहे.
  •  महिन्यातून केवळ सहा दिवस हे औषध घ्यायचे आहे.
  •  जगभरात हजारो डॉक्टर हे औषध वापरत आहेत.
  •  भारतातही सर्वाधिक या औषधाचा वापर केला जात आहे.
  •  मुंबई पोलीसांना औषधांचे सर्वप्रथम वितरण करण्यात आले.
  •  पत्रकारांना या औषधांचे वितरण करण्यात आले.
  •  रुग्णालयातील नर्स, फळ विक्रेते, वॉचमन यांनाही या औषधाचे वितरण करण्यात आले.
  •  लोकप्रतिनिधींना औषधांचे वितरण करण्यात आले.
  •  मुंबई अग्निशमन दलास औषधाचे वितरण करण्यात आले.
  •  एक लाख किटस मोफत वितरित करण्यात आले आहेत.
  •  बेस्टला औषध देण्यात आले.


 

Read in English

Web Title: Corona is dying: Mumbai doctor developed homeopathic medicine with the help of 100 doctors from all over the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.