कोरोनामुळे पोलिसांकडील ब्रेथ अ‍ॅनालायझर धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:13 AM2021-02-20T04:13:08+5:302021-02-20T04:13:08+5:30

मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांना ओळखणे पाेलिसांसाठी झाले अवघड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मद्य प्राशन केलेले वाहनचालक ओळखण्यासाठी कर्तव्यावर ...

Corona eats dust analyzer dust from police | कोरोनामुळे पोलिसांकडील ब्रेथ अ‍ॅनालायझर धूळ खात

कोरोनामुळे पोलिसांकडील ब्रेथ अ‍ॅनालायझर धूळ खात

Next

मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांना ओळखणे पाेलिसांसाठी झाले अवघड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मद्य प्राशन केलेले वाहनचालक ओळखण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांकडून वेळोवेळी ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राचा वापर केला जात होता. मात्र, वर्षभरापासून कोरोनामुळे हा वापर पूर्णपणे थांबला. त्यामुळे मद्यपींचे फावले असून, अशा मद्यपी वाहनधारकांना ओळखायचे कसे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. वर्षभरापासून महामार्ग पोलिसांकडे ब्रेथ अ‍ॅनालायझर धूळ खात पडून आहेत.

कोरोना महामारी सुरू झाल्यापासून ब्रेथ अ‍ॅनालायझरचा वापर करण्यावर निर्बंध आले. जवळपास वर्षभर ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनचा वापर झाला नाही; परंतु रस्त्याने दुचाकीवरून जाताना पोलिसांनी काहीजणांना अडवले. त्यांच्या तोंडाला दारूचा वास आल्यानंतर पोलिसांनी अशा वाहनचालकांवर कारवाई केली. काहीजणांची रक्त तपासणी करण्यात आली.

* सप्टेंबरमध्ये सर्वांत कमी कारवाई

मार्चपासून डिसेंबरपर्यंत राज्यात मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सर्वांत कमी सप्टेंबरमध्ये ८३ मद्यपींवर कारवाई झाली. एप्रिलमध्ये ९५ आणि जुलैमध्ये ९९ जणांवर कारवाई करण्यात आली. या काळात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. त्यामुळे या कारवाया थंडावल्या.

दरम्यान, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे शासनाने ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनचा वापर करण्यास निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही मद्यपींवर अलीकडे वेगाने कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे एका वरिष्ठ महामार्ग पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

* ड्रंक ॲंड ड्राइव्ह कारवाई

जानेवारी - ७५६९

फेब्रुवारी - ६५७१

मार्च -९५

मे -१२४

जून -२४१

जुलै -९९

ऑगस्ट -३६१

सप्टेंबर ८३

ऑक्टोबर २४३

नोव्हेंबर ३४९

डिसेंबर ३०८१

* कोरोना काळात मद्याची सर्वाधिक खरेदी

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मद्यविक्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, तरीही अनेकजण लपूनछपून मद्य विक्री करत होते. अशा व्यावसायिकांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा वाईन शॉप दुकानांवर अक्षरश: रांगा लागल्या. अनेकांनी घरात स्टॉक करून ठेवला. त्यामुळे कोरोना काळात मद्यविक्रीचा खप सर्वाधिक होता.

................

Web Title: Corona eats dust analyzer dust from police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.