विमानांच्या गगनभरारीला कोरोनारूपी ग्रहण! वर्षभरात केवळ १ लाख १५ हजार विमानांचे उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 07:34 AM2021-05-11T07:34:58+5:302021-05-11T07:35:15+5:30

देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांच्या यादीत मुंबईचा वरचा क्रमांक लागतो. परंतु, कोरोनामुळे येथील वर्दळ निम्म्याहून कमी झाली आहे. कोविडपूर्वकाळाचा विचार करता मुंबई विमानतळावरून वर्षाला सरासरी ३ लाख विमानांचे उड्डाण व्हायचे. 

Corona-like eclipse to the flght Only 1 lakh 15 thousand flights a year | विमानांच्या गगनभरारीला कोरोनारूपी ग्रहण! वर्षभरात केवळ १ लाख १५ हजार विमानांचे उड्डाण

विमानांच्या गगनभरारीला कोरोनारूपी ग्रहण! वर्षभरात केवळ १ लाख १५ हजार विमानांचे उड्डाण

Next

 
मुंबई : कोरोनामुळे माणसांच्या संचारावर निर्बंध आल्याने त्याचा सर्वाधिक फटका हवाई वाहतुकीला बसला आहे. मुंबई विमानतळावरून गेल्या वर्षभरात झालेल्या विमान प्रचलनाची आकडेवारी पाहिल्यास त्याचा अंदाज येईल. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान येथून १ लाख १५ हजार ८६४ विमानांनी उड्डाण केले. २०१९-२० च्या तुलनेत त्यात ६२ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांच्या यादीत मुंबईचा वरचा क्रमांक लागतो. परंतु, कोरोनामुळे येथील वर्दळ निम्म्याहून कमी झाली आहे. कोविडपूर्वकाळाचा विचार करता मुंबई विमानतळावरून वर्षाला सरासरी ३ लाख विमानांचे उड्डाण व्हायचे. 

आता ही संख्या एक लाखाच्या घरात स्थिरावली आहे. २०१९-२० मध्ये येथून ३ लाख ४ हजार ६७५ विमानांनी उड्डाण केले. तर २०२०-२१ मध्ये त्यात जवळपास ६२ टक्क्यांची घट झाली आहे. आणखी वर्षभर ही स्थिती कायम राहिल्यास हवाई वाहतूक क्षेत्र धोक्यात येईल, अशी भीती वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली.

मुंबईपाठोपाठ राज्यातील इतर महत्त्वाच्या विमानतळांवरील उड्डाणसंख्येतही प्रचंड घट नोंदविण्यात आली आहे. त्यात पुणे ६३.५० टक्के घट (१९ हजार ८३१ विमान प्रचलन), नागपूर ५९.८० टक्के घट (९ हजार २८२ विमान प्रचलन), औरंगाबाद ५८.६० टक्के घट (१ हजार ८७२ विमान प्रचलन) या विमानतळांचा समावेश आहे.
दिल्लीसह देशातील अन्य वर्दळीच्या विमानतळांवरील विमान प्रचलनही कोरोनाकाळात कमी झाले आहे. 
दिल्ली विमानतळावरील उड्डाणसंख्येत ५२.४० टक्के, बंगळुरू ५०.७० टक्के, हैदराबाद ५३.१०, कोची ६२.३०, कोलकाता ५६.५०, अहमदाबाद ५२.५०, गोवा ६१.६० टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

कारणे काय?
गेल्या वर्षी मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर निर्बंध लागू केल्याने परदेशात सेवा देणारी बहुतांश खासगी विमाने बंद आहेत. केवळ एअर इंडिया पूर्ण क्षमतेने वाहतूक करीत आहे. दुसरीकडे देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने वर्दळीचे मार्ग वगळता अन्य ठिकाणच्या फेऱ्या मर्यादित करण्यात आल्या आहेत. परिणामी विमान उड्डाणांचा आलेख घसरल्याचे दिसून येते.
 

Web Title: Corona-like eclipse to the flght Only 1 lakh 15 thousand flights a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.