लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता मुंबई महापालिका लसीकरणाची मोहीम हाती घेणार आहे. मात्र, नागरिकांच्या लसीकरणाबाबत आराखडा तयार नाही. नागरिकांना लस मोफत मिळणार का? हे ठरलेले नाही. याबाबतचा निर्णय केंद्र आणि राज्य घेईल. परिणामी, तिसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना मिळणारी लस मोफत की विकत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहिल्या टप्प्यात १ लाख २५ हजार सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात निम वैद्यकीय कर्मचारी, कोरोनाबाबत काम केलेले पालिकेचे आणि खासगी सफाई कर्मचारी, इतर फ्रंट लाइन कर्मचारी, पोलीस, बेस्टचे कर्मचारी, राज्य परिवहन सेवेचे कर्मचारी अशा ५ ते ६ लाख नागरिकांना लस दिली जाईल, तर तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिक, सहव्याधी, दमा, मधुमेह, हृदयविकार, तसेच दीर्घकाली आजार असलेल्या रुग्णांचा समावेश आहे.
-----------------------
अशी लसीकरणाची मोहीम
- आठ ठिकाणी लसीकरण
- लस घेतल्यानंतर ३० मिनिटे तेथेच थांबावे लागणार
- शहरातील चार प्रमुख रुग्णालयासह उपनगरातील चार रुग्णालयात लसीकरण
- पहिला टप्पा १० ते १५ दिवसांत पूर्ण होणार
- दोन डोस २१ ते २८ दिवसांच्या अंतराने
-----------------------
कुठे मिळणार लस?
- नायर दंत रुग्णालय
- नायर सर्वसाधारण रुग्णालय
- केईएम
- लोकमान्य टिळक रुग्णालयात
- कुर्ला भाभा
- राजावाडी
- वांद्रे भाभा
- जागेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालय