कोरोनाने जगण्याचा नवा मंत्र दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:05 AM2021-03-22T04:05:52+5:302021-03-22T04:05:52+5:30
- महेश नाईक, मुंबई कोरोनाकाळात खूप साऱ्या संकटांना तोंड द्यावे लागले. मात्र, या कोरोनाने मला भरपूर गोष्टी शिकवल्या. मुंबईत ...
- महेश नाईक, मुंबई
कोरोनाकाळात खूप साऱ्या संकटांना तोंड द्यावे लागले. मात्र, या कोरोनाने मला भरपूर गोष्टी शिकवल्या. मुंबईत जगण्यासाठी लागणारे कौशल्य माहीत पडले. कठीण प्रसंगांना तोंड देण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. तसेच एक गोष्ट माहीत पडली की, नोकरी कायमस्वरूपी नाही. ती आज आहे, उद्या नाही. मात्र, स्वतःचा व्यवसाय असेल तर आपण मुंबईसारख्या शहरामध्ये जगू शकतो.
कोरोनामुळे मास्क वापरणे हे किती महत्त्वाचे आहे, ते समजले. भारतासारख्या देशामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. मास्कमुळे आपण प्रदूषणापासून वाचू शकतो. तसेच मास्क आणि स्वच्छतेच्या सवयीमुळे आपण आजारापासून दूर राहू शकतो. आजपर्यंत आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले नव्हते, मात्र आपण कोरोना आल्यापासून जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला. या कठीण काळात पैशांची बचत कशी करावी, हे शिकलो. स्वतःच्या गरजेप्रमाणे पैसे खर्च करावेत, हे देखील कोरोनाने शिकवले. कोरोनाने नातेसंबंध जपत तसेच स्वतःच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यातला आनंद देऊन जगण्याचा नवा मंत्र दिला.