Join us

मुंबईत झपाट्याने वाढतोय कोरोना, 24 तासांतील आकडेवारी चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 11:47 PM

आतापर्यंत मुंबईत सात लाख ८५ हजार ११० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ९५ टक्के म्हणजे सात लाख ४९ हजार ७०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

ठळक मुद्दे दिवसभरात बाधित आढळून आलेल्या पाच हजार ६३१ रुग्णांपैकी केवळ ४९७ रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागले आहेत.

मुंबई - गेल्या २४ तासांत मुंबईत पाच हजार ६३१ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.२० टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्या १६ हजार ४४१ वर पोहोचली आहे. मात्र बाधितांपैकी बहुतांशी लक्षणविरहित असल्याने सध्या केवळ २३७१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच शुक्रवारी एकाच बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

आतापर्यंत मुंबईत सात लाख ८५ हजार ११० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ९५ टक्के म्हणजे सात लाख ४९ हजार ७०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी ५४८ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे आतापर्यंत १६ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात बाधित आढळून आलेल्या पाच हजार ६३१ रुग्णांपैकी केवळ ४९७ रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागले आहेत. तर ४२२३ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. 

कोविड चाचण्यांमध्ये वाढ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर दररोजचा चाचण्यांचे प्रमाण २८ ते ३० हजार एवढे होते. मात्र मागील दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ दिसत आहे. त्यामुळे दररोजच्या कोविड चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. शुक्रवारी ४७ हजार ४७२ लोकांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एक कोटी ३६ लाख ७० हजार २६२ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. मुंबईतील  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईकोरोनाची लस