राज्यात पुन्हा कोरोना वाढतोय, मास्क वापरा; मुख्यमंत्री ठाकरेंच आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 08:55 AM2022-05-27T08:55:20+5:302022-05-27T08:55:30+5:30
राज्याची साप्ताहिक संसर्ग दर १.५९ टक्के असून, मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक संसर्ग दर आढळून आला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांमध्ये संथपणे वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असून जनतेने मास्क वापरत रहावे, असे आवाहन मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले.
राज्याची साप्ताहिक संसर्ग दर १.५९ टक्के असून, मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक संसर्ग दर आढळून आला आहे. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून, ठाण्यामध्ये २७.९२ टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात १८.५२ टक्के ६८.७५ टक्के इतकी वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले. सध्या१८ पेक्षा अधिक वयाच्या ९२.२७ टक्के लोकांना एक डोस देण्यात आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले असून, ते वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यात आढळणारे काेराेना रूग्ण
२६ मे ५११
२५ मे ४७०
२४ मे ३३८
२३ मे २०८
२२ मे ३२६
२१ मे ३०७
२० मे ३११