मनोहर कुंभेजकर
मुंबई : पश्चिम उपनगरातील आर मध्य(बोरिवली),पी उत्तर(मालाड),आर दक्षिण(गोरेगाव),के पश्चिम(विलेपार्ले पश्चिम ते जोगेश्वरी पश्चिम),के पूर्व(विलेपार्ले पूर्व ते जोगेश्वरी पूर्व) या 5 वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.
मास्क लावत नसलेले व सॊशल डिस्टनसिंग पाळत नसलेले नागरिक, मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विनाकारण फिरत असलेले नागरिक आणि 20 ते 30 टक्के वाढलेले अनधिकृत फेरीवाले यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पश्चिम उपनगरातील चित्र आहे. त्यामुळे नियम पाळत नसलेल्या नागरिकांना कशी वेसण घालायची आणि कोरोना कसा रोखायचा हा पालिका प्रशासनापुढे मोठा प्रश्न आहे. येत्या ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणाऱ्या वॉर्ड मध्ये लॉकडाऊन होणार का?अशी चर्चा जोरदार येथील नागरिक व दुकानदारांमध्ये आहे.
आर मध्य वॉर्ड मध्ये दि,18 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 11106 रुग्ण होते,तर काल दि,25 पर्यंत 12341 रुग्ण झाले असून गेल्या 7 दिवसात 1245 रुग्ण वाढले आहेत.आतापर्यंत 9757 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 151 रुग्णांचा मृत्यू झाला,तर 2233 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.या वॉर्ड मध्ये कोरोना वाढीचा दुपटीचा दर 46 दिवस आहे.
आर दक्षिण वॉर्ड मध्ये दि,18 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 9386 रुग्ण होते,तर काल दि,25 पर्यंत 10223 रुग्ण झाले असून गेल्या 7 दिवसात 837 रुग्ण वाढले आहेत.आतापर्यंत 8148 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 291 रुग्णांचा मृत्यू झाला,तर 1748 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.या वॉर्ड मध्ये कोरोना वाढीचा दुपटीचा दर 57 दिवस आहे.
के पश्चिम वॉर्ड मध्ये दि,18 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 10638 रुग्ण होते,तर काल दि,25 पर्यंत 11707 रुग्ण झाले असून गेल्या 7 दिवसात 1068 रुग्ण वाढले आहेत.आतापर्यंत 9375 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 370 रुग्णांचा मृत्यू झाला,तर 1961 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.या वॉर्ड मध्ये कोरोना वाढीचा दुपटीचा दर 51 दिवस आहे.
के पूर्व वॉर्ड मध्ये दि,18 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 10627 रुग्ण होते,तर काल दि,25 पर्यंत 11405 रुग्ण झाले असून गेल्या 7 दिवसात 778 रुग्ण वाढले आहेत.आतापर्यंत 9308 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 585 रुग्णांचा मृत्यू झाला,तर 1512 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.या वॉर्ड मध्ये कोरोना वाढीचा दुपटीचा दर 69 दिवस आहे.सर्वात जास्त मृत्यू या वॉर्ड मध्ये झाले आहेत.