कोरोनामुळे फुप्फुसासाेबतच मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:06 AM2021-05-14T04:06:33+5:302021-05-14T04:06:33+5:30

वैद्यकीय तज्ज्ञ; समुपदेशन, औषधोपचारांची मदत घेण्याचा सल्ला स्नेहा माेरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या उपचारानंतरही सरासरी सहा महिन्यांपर्यंत ...

Corona has adverse effects on mental health as well as the lungs | कोरोनामुळे फुप्फुसासाेबतच मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम

कोरोनामुळे फुप्फुसासाेबतच मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम

Next

वैद्यकीय तज्ज्ञ; समुपदेशन, औषधोपचारांची मदत घेण्याचा सल्ला

स्नेहा माेरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या उपचारानंतरही सरासरी सहा महिन्यांपर्यंत कोरोनाचा परिणाम शरीरावर होत असतो, असे काही संशोधनांमधून समोर आले आहे. कोरोना फक्त शरीराच्या फुप्फुसावरच परिणाम करत नाही, तर तो मानसिक आरोग्यावरही परिणाम करत असल्याचे दिसून आले आहे.

अलगीकरणामुळे पीडित व्यक्तींमध्ये नैराश्य, चिंता, बदलता स्वभाव, चिडचिडेपणा, गैरसमज, स्वयंनियंत्रणाचा अभाव बऱ्याच प्रमाणात आढळतो. ताणतणावामुळे गोंधळ, मोठ्या प्रमाणात राग यासारख्या दीर्घकाळ टिकणाऱ्या मानसिक तणावाची लक्षणे दिसतात. त्यामुळे यावर उपाय करणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश संघवी यांनी मांडले. त्यात शारीरिक व्यायाम, दिनक्रम बनविणे, एखाद्याला आनंद मिळणाऱ्या उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवणे ज्याद्वारे सकारात्मक विचार वाढतील, असे ते म्हणाले. एकत्रित केलेल्या क्रियांच्या माध्यमातून कुटुंबाशी असलेले नाते दृढ करता येते, असा सल्लाही त्यांनी दिला.

कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांना वेगळ्या प्रकारची मानसिक भीती दिसून येते. मानसिक आजारांवर योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. खुलेपणाने चर्चा केल्याने अनेक प्रश्न आणि समस्या सोडवता येऊ शकतात. त्यामुळे व्यक्त होण्याचे अनेक फायदे आहेत. मनोविकारांनी त्रस्त असणाऱ्या व्यक्तींसोबत भेदभाव न करता त्यांना समजून घ्या, असे मत मानसाेपचारतज्ज्ञांनी मांडले.

मनावरचे ओझे हलके करा, डॉक्टरांची मदत घ्या

सध्याच्या या कठीण काळात कोरोनामुक्त झाल्यानंतरही रिकामपणात मन सैरभैर होण्याची भीती आहे. भविष्याची काळजी मनाला घेरू शकते; पण त्यासाठीच मन कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. या काळात पुरेशी झोप घ्या. ध्यानधारणा, योगसाधना करा. निराशा आणि नकारात्मकता दूर ठेवा. वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला, योग्य औषधोपचार घेण्याची आवश्यकता आहे.

- डॉ. नीलेश शहा, मानसोपचारतज्ज्ञ

* लॅन्सेट अहवालातही निरीक्षण

लॅन्सेट सायकायट्री जर्नलमध्ये याबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनामुक्त झालेल्या २,३०,००० हून अधिक लोकांच्या आरोग्याच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यापैकी ३४ टक्के लोकांना ६ महिन्यांत न्यूरॉलॉजिकल किंवा मानसिक समस्यांनी ग्रासले होते. १७ टक्के लोक अत्यंत चिंताग्रस्त, तर १४ टक्के लोकांमध्ये मूड डिसऑर्डरची लक्षणे आढळून आली. कोरोनामुक्त झालेल्या लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य या दोन गोष्टी प्रामुख्याने आढळून आल्या.

----------------------------------

Web Title: Corona has adverse effects on mental health as well as the lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.