कोरोनामुळे देशात मोठ्या घरांच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:05 AM2021-06-19T04:05:54+5:302021-06-19T04:05:54+5:30

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांमध्ये कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीचा जास्त अवलंब करण्यात ...

Corona has increased the demand for large houses in the country | कोरोनामुळे देशात मोठ्या घरांच्या मागणीत वाढ

कोरोनामुळे देशात मोठ्या घरांच्या मागणीत वाढ

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांमध्ये कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीचा जास्त अवलंब करण्यात आला. घर बसल्या कार्यालयाचे काम व्यवस्थितरीत्या करता यावे यासाठी मोठ्या घरांच्या मागणीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र देशभर दिसून येत आहे. कोरोनाच्या आधी सरासरी १ ते २ बीएचके घरांना नागरिक पसंती दर्शवत होते. मात्र आता त्याहूनही मोठे व जास्त क्षेत्रफळ असणारे घरखरेदी करण्यास ग्राहक पसंती दर्शवित आहेत. क्रेडाई-सीआरई मॅट्रिक्स या संस्थांमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे.

कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम ट्रेंडमुळे सुमारे ५० ते ८० चौरस फूट क्षेत्रफळाची अतिरिक्त मागणी घर खरेदीदारांकडून होऊ लागली आहे. १ आणि २ बीएचके घर घेणारे ग्राहकदेखील सरासरी ५४२ चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घराची मागणी करत आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातदेखील मागील काही वर्षांमध्ये मोठ्या घरांच्या मागणीत वाढ झालेली दिसून येत आहे. दक्षिण मुंबईत ६३० ते ११५० क्षेत्रफळ असणाऱ्या ४७ टक्के घरांची खरेदी झाली. यामध्ये ८०१ ते ९८० चौरस फुट ३ बीएचके घरांची मागणी जास्त होती.

मुंबईमध्ये उपनगरात ३८५ ते ७५० क्षेत्रफळ असणारे ५४ टक्के घरांची खरेदी झाली. यामध्ये १०८७ ते ११७० चौरस फुट ३ बीएचके घरांची मागणी जास्त होती. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातदेखील ४२० ते ८८० चौरस फूट क्षेत्रफळाच्या २ बीएचके घरांना जास्त मागणी आहे, तर नवी मुंबईत ३४० ते ६४० चौरस फुटांच्या टू बीएचके घरांची ७४ टक्के खरेदी झाली.

कोट

‘वर्क फ्रॉम होम’मुळे मागील दोन वर्षांत मोठ्या घरांची मागणी वाढली. १ आणि २ बीएचके घर घेतानादेखील ग्राहक जास्त क्षेत्रफळ असलेल्या घरांना पसंती दर्शवित आहेत, तर अनेक ग्राहक आता ३ आणि ४ बीएचके घरांना पसंती दर्शवत आहेत. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील घरखरेदीचा ट्रेंड बदलत असल्याचे दिसून येत आहे.

- दीपक गोराडिया, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ

Web Title: Corona has increased the demand for large houses in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.