Join us

CoronaVirus News : क्रुझ पर्यटनाला कोरोनाचा फटका, ८४ जहाजांचे आगमन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 1:18 AM

CoronaVirus News : मुंबई बंदरात येण्याचे निश्चित झालेल्या तब्बल ८४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचा मोठा आर्थिक फटका मुंबई बंदरालाही बसला.

खलील गिरकर मुंबई : कोरोनामुळे जगात विविध ठिकाणी अनेक निर्बंध लादण्यात आले. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या महत्त्वाकांक्षी क्रुझ पर्यटनावरही याचा विपरीत परिणाम झाला. मुंबई बंदरात येण्याच्या तयारीत असलेल्या विविध देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जहाजांना प्रवासाचा बेत स्थगित करावा लागला. मुंबई बंदरात येण्याचे निश्चित झालेल्या तब्बल ८४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचा मोठा आर्थिक फटका मुंबई बंदरालाही बसला.मार्चच्या दुसºया आठवड्यापासून मुंबई बंदरात क्रुझ येण्यावर प्रतिबंध लादण्यात आले. तेव्हापासून ३१ मेपर्यंत मुंबई बंदरात आंतरराष्ट्रीय जहाजांच्या २५ फेºया, तर देशांतर्गत जहाजांच्या ५९ फेºया रद्द झाल्या आहेत. विदेशी जहाजांतून मुंबई शहरात येणाºया पर्यटकांचे प्रमाण शून्यावर आल्याने मुंबईतील पर्यटन व्यवसायालाही कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. साधारणत: ३१ मेपर्यंत क्रुझचे आगमन सुरू असते. मात्र यंदा नेमक्या त्याच कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन तसेच विविध बंधनांमुळे क्रुझचे आगमन लांबले. एका क्रुझच्या माध्यमातून बंदरात, शहरात सरासरी १२०० प्रवाशांचे आगमन होते. यंदा हे क्रुझच आले नसल्याने प्रवाशांचे प्रमाण शून्यावर गेले.नाविकांच्या सीआॅफच्या माध्यमातून बंदराला उत्पन्नएकीकडे क्रुझचे आगमन बंद झाल्याने तसेच पर्यटन ठप्प झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागणाºया मुंबई बंदराला नाविकांच्या सीआॅफच्या माध्यमातून काही उत्पन्न मिळू शकले. जगाच्या विविध क्रुझवर असलेल्या नाविकांना काम संपल्यावर घरी सोडण्यासाठी विविध देशांतील क्रुझचे मुंबई बंदरात आगमन झाले. त्या माध्यमातून बंदराला काही उत्पन्न मिळाले.लॉकडाऊन कालावधीत (२० जूनपर्यंत) मुंबई बंदराद्वारे ७,१४६ जण जहाजावरील काम पूर्ण झाल्याने घरी परतले. (साईन आॅफ केले) तर ९१५ जण जहाजावरील कामासाठी रुजू झाले (साईन इन केले), अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ ट्रॅफिक मॅनेजर व क्रुझ विभागाचे नोडल अधिकारी गौतम डे यांनी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस