कोरोनाचा मुंबई पोर्ट ट्रस्टला फटका; वाहन निर्यातीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 01:20 AM2020-07-24T01:20:06+5:302020-07-24T01:20:22+5:30
लॉकडाऊन कालावधीत अवघ्या १४,३०१ वाहनांची निर्यात
- खलील गिरकर ।
मुंबई : जागतिक पातळीवर कोरोनाचा प्रसार झाल्याने अनेक देशांमध्ये दुसऱ्या देशातील वस्तूंच्या आयात-निर्यातीवर निर्बंध आले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टलाही याचा मोठा फटका बसला आहे. मुंबई बंदरातून एप्रिल ते जून या कालावधीत अवघ्या १४ हजार ३०१ वाहनांची निर्यात झाली, तर गतवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत हे प्रमाण ५१ हजार ८३९ एवढे होते.
मुंबई बंदरातून होणाºया एकूण निर्यातीमध्ये वाहन निर्यातीचे प्रमाण मोठे आहे. मात्र, यंदा हे प्रमाण कमालीचे घसरले आहे.
लॉकडाऊन कालावधीत २३ मार्च ते ९ जुलैपर्यंत मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे ४२९ मालवाहू जहाजांच्या माध्यमातून आयात-निर्यात करण्यात आली. गतवर्षी २३ मार्च ते ९ जुलै या कालावधीत ६२३ मालवाहू जहाजांद्वारे ही आयात-निर्यात करण्यात आली होती.
ड्राय बल्कमध्ये ३,०३२ हजार टन आयात-निर्यात झाली. गतवर्षी हे प्रमाण ५,०५१ हजार टन होते. ब्रेक बल्कमध्ये ७९९ हजार टन आयात-निर्यात झाली. गतवर्षी हे प्रमाण १,६४१ हजार टन होते. लिक्विड बल्कमध्ये ९,४७० हजार टन आयात-निर्यात झाली. गतवर्षी हे प्रमाण ११,१३९ हजार टन होते.
कंटेनर मालवाहतुकीत २२ हजार टन माल हाताळण्यात आला, तर गतवर्षी हे प्रमाण ९१ हजार टन इतके होते. लॉकडाऊनमुळे
उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने त्याचा परिणाम आयात व निर्यातीवर झाला आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया म्हणाले, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बंदराद्वारे होणाºया व्यापारावर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र, आम्ही उपलब्ध कर्मचारी वर्ग व संसाधनांच्या माध्यमातून शक्य तितके चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.