राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढतोय; दिवसभरात १५ हजारांहून अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:06 AM2021-03-14T04:06:45+5:302021-03-14T04:06:45+5:30

सक्रिय रुग्ण १ लाख १८ हजारांवर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या ...

Corona incidence is increasing in the state; More than 15,000 patients in a day | राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढतोय; दिवसभरात १५ हजारांहून अधिक रुग्ण

राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढतोय; दिवसभरात १५ हजारांहून अधिक रुग्ण

Next

सक्रिय रुग्ण १ लाख १८ हजारांवर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी १५ हजार ६०२ रुग्ण आणि ८८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २२,९७,७९३ झाली असून बळींचा आकडा ५२ हजार ८११ झाला आहे.

राज्यात १ लाख १८ हजार ५२५ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. शनिवारी दिवसभरात ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण २१,२५,२११ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्के झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूचे प्रमाण २.३ टक्के आहे. शनिवारी नोंद झालेल्या एकूण ८८ मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २१ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७४,०८,५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७०,६९५ व्यक्ती होमक्वारंटाईन, तर ५,०३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title: Corona incidence is increasing in the state; More than 15,000 patients in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.