मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसचा शेवट हा आता जवळ असून २१ मे नंतर महाराष्ट्र व पश्चिम बंगाल या राज्यांत कोरोनाचा एकाही नवीन रुग्ण आढळणार नाही. उत्तर प्रदेश आणि कर्नाटका राज्यांत १० मे पर्यंत प्रादुर्भाव राहणार आहे. देशातील आंध्र प्रदेश, दिल्ली, हरयाणा , गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड , मध्यप्रदेश , पंजाब , तामिळनाडू, राजस्थान , तेलंगणा या राज्यात ७ मे पर्यंत कोरोना प्रादुर्भाव दिसून येईल व त्यानंतर तेथे नवीन रुग्ण आढळणार नसल्याचे भाकीत मुंबई विद्यापीठाच्या स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक स्कुल (अर्थशास्त्र विभाग) ने केला आहे. विभागाने देशभरातील विविध राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. या अभ्यासाच्या अनुषंगाने हे भाकीत करण्यात आले आहे.जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. देशासह राज्यातील कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे 3 मे पर्यंत लागू केलेला लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत. या परिस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाने डॉ नीरज हातेकर यांच्या नेतृत्वाखाली कोरोना बाबत एक अहवाल तयार केला आहे. यासाठी त्यांना वांद्याच्या एमएमके कोलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापिका पल्लवी बेल्हेकर यांची मदत मिळाली आहे . या अहवालासाठी देश विदेशातील कोरोना प्रभावित भागांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालामध्ये विविध देशांतील व राज्गोयांतील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा कमी होण्याचे आणि दुपटीच्या संक्रमण प्रमाणाचा अभ्यास करून अंदाज काढण्यात आला आहे. कोरोना आजार सुरुवातीला हळू पसरतो. त्यानंतर नागरिकांना कोरोनाची वेगाने लागण होते आणि त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होत जातो. त्याचप्रमाणे एक असा दिवस येतो की कोरोनाचा प्रभाव शून्य होतो. हे निष्कर्ष देशातील विविध राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास करून काढण्यात आला आहे. भारतातील राज्यांची कोरोनाबाधीतांची उपलब्ध संख्या आणि अभ्यास यांवरून प्रत्येक राज्यात नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण केव्हा बंद होईल याच्या अंदाजित तारखा अनुमानीत करण्यात आल्या आहेत.या अहवालातील अभ्यासावरून असे दिसून आले आहे की कोरोनाचे संक्रमण हे राज्यांतील काही विशिष्ट शहरी भागातून पसरत आहे. महाराष्ट्रातील ५५ % हून अधिक संक्रमण मुंबई , ठाणे , पुणे , नाशिक , नागपूर येथून होत आहे. तर म्ध्यप्रदेशांत भोपाळ व इंदूर या शहरातील प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. राजस्थानातील ४१ टक्के रुग्ण जयपूर , जोधपुर , भागलपूर येथील असून गुजरातेतील ५९ % रुग्ण केवळ ३ शहरातून आहेत. त्यामुळे हे संक्रमण मर्यादित असून त्यामुळे प्रादुर्भावाचा धोका ही मर्यादित राहू शकतो. तर कोरोनाचे संक्रमण पुन्हा मोठ्या प्रमणात होईलदेशातील नागरिकांनी लॉकडाऊनचे खूप चांगल्या प्रकारे पालन केले आहे. त्यामुळेच कोरोना आजारावर मात करण्यासाठी सरकारला यश आले.मात्र सध्सया दुसऱ्द्याया राज्ययातील गरीब मजदूर , विद्यार्थी , परप्रांतीयांचे हाल होत असून त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सद्यस्थितीत या शहरातील स्थलांतर पुन्हा सुरु केल्यास संक्रमणाचा धोका पुन्हा वाढू शकतो. जर हे संक्रमण या निमित्ताने गावांत आणि गरीब राज्यांत पोहचले तर यावर नियंत्रण करणे कठीण होणार असल्याचे अहवालाच्या निष्कर्षात म्हटले आहे.