मुंबई : राज्यात रविवारी ३ हजार २०६ रुग्ण आणि ३६ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर सध्या ३७ हजार ८६० रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ३ हजार २९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६३ लाख ६४ हजार २७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८१ लाख ५८ हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.२५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ६१ हजार ७२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर १ हजार ५१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के असून मृत्यूदर २.१२ टक्के आहे.
राज्यात पुण्यात ९३८६, मुंबई ५१६६, ठाणे ५८६२, सातारा २५७ इ. रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४४ हजार ३२५ असून, मृतांची संख्या १ लाख ३८ हजार ८७० आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ३६ मृत्यूंमध्ये मुंबई ५, नवी मुंबई मनपा १, वसई विरार मनपा १, नाशिक २, नाशिक मनपा २, अहमदनगर ३, पुणे २, सोलापूर २, सातारा ५, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी २, उस्मानाबाद २, बीड १ इ. रुग्णांचा समावेश आहे.