Join us

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 9:18 AM

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनावर नियंत्रण मिळविले जात असले तरी शुक्रवारच्या अहवालानुसार मुंबईत दिवसभरात १३ कोरोना रुग्णांचा ...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनावर नियंत्रण मिळविले जात असले तरी शुक्रवारच्या अहवालानुसार मुंबईत दिवसभरात १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर १ हजार ३१ रुग्णांचे निदान झाले. एकूण बाधितांची संख्या २ लाख ७३ हजार ४८० एवढी आहे. शुक्रवारी ५५३ रुग्ण बरे झाले असून एकूण काेराेनामुक्त रुग्णांची संख्या २ लाख ५० हजार ४५६ असून ९ हजार ४३ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण मृतांची संख्या १० हजार ६३७ आहे. रुग्ण दुपटीचा दर २९६ दिवस आहे.