लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरात आतापर्यंत २२९ पोलिसांना कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील २४ तासांत तब्बल ७ जणांचा कोरोनाने बळी घेतला. एकूण मृतांमध्ये मुंबई पोलीस दलातील सर्वाधिक ७९ पोलिसांचा समावेश आहे. यात मुंबई पाठोपाठ ठाणे, नागपूर, नवी मुंबईचा क्रमांक लागतो.
राज्यात आतापर्यंत २१,५७४ पोलिसांना कोरोना झाला आहे. यापैकी १७,७९७ जणांनी कोरोनावर मात केली, तर ४४२ अधिकारी आणि ३ हजार १०६ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वाधिक सक्रिय पोलीस रुग्ण नागपूर शहरात आहेत. येथील ६६ अधिकारी, ६०० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत १२५ अधिकारी, ४५० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत, तर १०,५४२ जणांना क्वारंटाइन केले आहे. दरम्यान, मागील २४ तासांत नवी मुंबई २ तर मुंबई, पुणे शहर, पुणे ग्रामीण, गोंदिया, अकोला येथे प्रत्येकी १ पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.राज्य पोलीस दलात आतापर्यंत झालेले मृत्यूमुंबई ७९, नवी मुंबई ९, ठाणे शहर २४, पुणे शहर ६, अमरावती शहर २, नागपूर शहर १५, नाशिक शहर ५, अहमदाबाद ३, सोलापूर शहर ३, ठाणे ग्रामीण ५, पालघर ४, रायगड ४, कोल्हापूर २, पुणे ग्रामीण ४, सातारा ४, सांगली ३, सोलापूर ग्रामीण ३, धुळे २, नाशिक ग्रामीण ६, जळगाव ३, अहमदनगर ४, नागपूर ग्रामीण २, गोंदिया २, उस्मानाबाद ३ आणि बीड, जालना, नांदेड, परभणी, बुलडाणा, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद ग्रामीण, रत्नागिरी, नंदुरबार येथे प्रत्येकी १ इत्यादी मिळून राज्यभरातील एकूण २२९ पोलिसांचा समावेश आहे.
एसआरपीएफच्या २५३ जवानांना बाधाएसआरपीएफचे १२ अधिकारी आणि २४१ जवान मिळून एकूण २५३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.