कोरोना : सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:05 AM2021-04-03T04:05:47+5:302021-04-03T04:05:47+5:30

मुंबई महापालिका; घरी विलगीकरण करून औषधोपचार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत असून, बाधितांमध्ये ...

Corona: Large number of patients with mild symptoms | कोरोना : सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी

कोरोना : सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी

Next

मुंबई महापालिका; घरी विलगीकरण करून औषधोपचार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेराेनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत असून, बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्यांची (एसिम्प्टोमॅटिक) व सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यांचे घरी विलगीकरण करून औषधोपचार दिले जात आहेत. त्याआधारे ते पूर्णपणे बरे होतात, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.

आता रुग्णाला घरी विलगीकरण करण्याची सूचना दिल्यानंतर वैद्यकीय पथकाच्या मदतीने अशा रुग्णाचे घर विलगीकरणासाठी योग्य असल्याची खात्री केली जाणार आहे, तर प्रसूतिकाळ दोन आठवड्यांवर असलेल्या गर्भवती महिलांना घरी विलगीकरण लागू नसेल. स्तनदा मातांच्या बाबतीत वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सकांच्या एकत्रित विचार-विनिमयानुसार योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे वाढीस लागली, तर त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

गृहविलगीकरणासाठी पात्रतेचे निकष

- जे रुग्ण कोविड चाचणी केल्यानंतर बाधित आढळले आहेत, अशा रुग्णांचे घरी विलगीकरण करता येऊ शकते.

- लक्षणे नसलेले बाधित (एसिम्प्टोमॅटिक), सौम्य लक्षणे असलेले (म्हणजे ज्यांना सहव्याधी नाहीत, ताप १०० फॅरनहाइटपेक्षा कमी आहे, ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा अधिक आहे व इतर सामान्य निकष), प्रौढ तसेच सहव्याधी असलेले, असे रुग्ण ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत, त्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांचे विलगीकरण करण्यात येईल.

रुग्णाने घ्यायची काळजी

- रुग्णासाठी खेळती हवा असलेली खोली, स्वतंत्र प्रसाधनगृह असणे गरजेचे आहे. रुग्णाने पल्स ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, फेस मास्क, हातमोजे, निर्जंतुकीकरण द्रव्य (सॅनिटायझर) याचा उपयोग करावा.

.......................

Web Title: Corona: Large number of patients with mild symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.