९१ ते १०० वयोगटांतील चार हजारांहून अधिक जणांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:09 AM2021-03-04T04:09:45+5:302021-03-04T04:09:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात आरोग्य आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनंतर आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले आहे. यात ४५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात आरोग्य आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनंतर आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले आहे. यात ४५ ते ६० वयोगटांतील आणि ६० हून अधिक वय, सहव्याधी असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे आतापर्यंत राज्यात ९१ ते १०० वयोगटातील तब्बल ४ हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अहवालात नमूद आहे.
राज्यात काेराेनाची सर्वाधिक ४ लाख ५३ हजार ८६९ एवढी रुग्णसंख्या ३१ ते ४० वयोगटांतील आहे. एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण २१.०१ इतके आहे. त्याखालोखाल ४१ ते ५० वयोगटांत ३ लाख ८८ हजार ७२०, २१ ते ३० वयोगटांत ३ लाख ५४ हजार ८८८, ५१ ते ६० वयोगटांत ३ लाख ५२ हजार ७८६ इतके रुग्ण आहेत. नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या गटात ७१ हजार ९०८ लहानग्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर ११ ते २० वयोगटातील १ लाख ४३ हजार ४२ रुग्ण आहेत. ८१ ते ९० वयोगटात ३३ हजार ४७, १०१ ते ११० वयोगटात ३० रुग्ण असल्याची नोंद आहे.
एकूण रुग्णसंख्येत ६१ टक्के पुरुष, ३९ टक्के महिला
बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९४ टक्के
गंभीर रुग्णांचे प्रमाण ५ टक्के
अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर असलेले रुग्ण ७ टक्के