Join us

Corona Mumbai : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा मोठा आकडा पार, कालच्या तुलनेत 39 टक्के रुग्णवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 7:53 PM

मुंबईतील जेजे रुग्णालयातील 61 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे दुपारी उघडकीस आले. त्यानंतर, मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 15,166 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी देखील आता 110 दिवसांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर 0.63 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. मुंबईतील रुग्णवाढ पाहता पालिका प्रशासन आणि राज्य सरकारसमोरील चिंता वाढली आहे

मुंबई - देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या (Coronavirus Patients) मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. दरम्यान मुंबई कोरोना विषाणूच्या त्सुनामीचाही सामना करण्यास तयार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मात्र, सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यात, मुंबईत आज दिवसभरात 15,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, ही चिंताजनक बाब व्यक्त होत आहे.  

मुंबईतील जेजे रुग्णालयातील 61 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे दुपारी उघडकीस आले. त्यानंतर, मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 15,166 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे कालच्या म्हणजेच 4 जानेवारीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत 39 टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली आहे.   मुंबईत मंगळवारी 10 हजार 860 नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे, मुंबई कोरोना वाढीचं केंद्रस्थान ठरत आहे. नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. 

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी देखील आता 110 दिवसांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर 0.63 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. मुंबईतील रुग्णवाढ पाहता पालिका प्रशासन आणि राज्य सरकारसमोरील चिंता वाढली आहे. त्यामुळे मुंबईत आता कडक निर्बंध लादले जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यातच, येथील जे.जे रुग्णालयातील 61 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आले आहे. या डॉक्टरांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं दिली. आता, मुंबईत एकाच दिवसात तब्बल 15 हजार रुग्णसंख्या वाढली आहे. 

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामुंबई