गृहनिर्माण सोसायटयांमध्ये कोरोनाला ‘नो एन्ट्री’; म्हाडातील सोसायटीत उपाय योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात असतानाच आता चाळी, झोपड्या आणि इमारतीमध्येही येथील रहिवासी आपआपल्या परिने कोरोनाला थोपविण्यासाठी कार्यरत आहेत. जनजागृती करणे, जंतुनाशकाची फवारणी करणे, एकमेकांमधील अंतर पाळणे, स्वच्छता राखणे; आणि याहून म्हणजे कोणत्याही साहिताच्या खरेदीसाठी गर्दी न करणे. हे उपाय प्रामुख्याने राबविण्यात येत असून, अधिकाधिक सुरक्षा बाळगण्यात येत असल्याचे चित्र चांदिवली येथील म्हाडा कॉलनीत निदर्शनास आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्•ााव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र झटत असताना चांदिवली म्हाडा कॉलनीतील काही गृहनिर्माण संस्थांनीही कोरोनाला दाराबाहेर ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शासकीय आदेशांचे पालन करत सोसायटी पदाधिकारी विविध उपक्रम राबवत कोरोनाविरोधी लढयात योगदान देत आहेत. एकूणच पाहता काही सोसायटींनी स्वत:च क्वारंटाईन होऊन घेतले असून आम्ही आमच्या सोसायटीत कोरोनाचा शिरकाव होऊ देणार नाही, असा निश्चय केला आहे. अशा सोसायटी व पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साफल्य सोसायटीचे सचिव संतोष नागेकर सांगितले की, आदर्श घ्यावा असे नियोजन आम्ही केले आहे. कोरोनाविरोधी लढा कसा लढायचा याचे आदर्श उदाहरण म्हणजे साफल्य सोसायटी. या सोसायटीने तातडीने उपाययोजना करून मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद केले. सामिप ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येक सदनिकेत मोफत मास्क व सॅनिटायझर बाटलीचे वाटप करण्यात आले. सोसायटीत नियमितपणे सॅनिटायझरची फवारणी करण्यासाठी स्वत:चे फवारणी यंत्र अध्यक्ष रविंद्र नेवरेकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. स•ाासदांसाठी दर दोन दिवसांनी थेट शेतावरून ग्राहकापर्यंत नाशिकहून •ााजीपाला टेम्पो मागविला जातो. याशिवाय दूध, अंडी, ब्रेड व इतर जीवनावश्यक वस्तू आतमध्येच उपलब्ध केल्या आहेत. याशिवाय आपल्या पदाधिका-यांसाठी दहा कोरोना प्रोटेस्ट किट उपलब्ध केले आहेत. दररोज सकाळ संध्याकाळ स•ाासदांना व मुलांना पदाधिका-यांच्या देखरेखीखाली टेरेसवर सोडले जाते.
साईसदन सोसायटी सचिव विजय सावर्डेकर यांनी सांगितले की, शासकीय आदेशाचे काटेकोर पालन केले जाते. साईसदन सोसायटी पदाधिकारी शासकीय आदेशाचे पालन करत स•ाासदांना दूध, अंडी, औषधे स्वत: आणून देत आहेत. सोसायटी आवारात रोज नियमितपणे ठरलेले तीन-चार •ााजी विक्रेते गाडी घेऊन येतात. सोशल डिस्टंन्सिगचे पालन करत सर्वांना •ााजी घेता येईल याची व्यवस्था केली आहे. सर्व स•ाासदांची किराणामालाची यादी बनवून तो आणल्यानंतर अध्यक्ष शैलेश घोगले यांचे देखरेखीखाली यादीप्रमाणे वाटप केले जाते. पाच-पाच स•ाासदांचा ग्रुप तीन-तीन तासांप्रमाणे मुख्यप्रवेशद्वारावर देखरेख करून कोणीही आत बाहेर करणार नाही याची काळजी घेतात.
ओम सोसायटीचे सचिव बालाजी माने यांनी सांगितले, आम्ही जनजागृतीवर •ार दिला आहे. मुख्य प्रवेशद्वारपाशी नवीन वॉश बेसीन बसवून कोरोना विषाणूला तेथेच रोखण्याचा प्रयत्न ओम सहकारी सोसायटीने केला आहे. बाहेरील कोणाही व्यक्तीला सोसायटीच्या आतमध्ये प्रवेश पूर्णत: बंद केला आहे. बाहेर जाणा-या स•ाासदाला आत येताना २० सेकंद हात स्वच्छ धूवूनच येण्यास परवानगी दिली जाते. संपूर्ण सोसायटी आवारात व प्रवेशद्वार नियमितपणे सॅनिटायझर फवारणी केली जाते. या व्यतिरिक्त महानगरपालिकेचे कोरोना विषयक जनजागृती करणारे फलक सोसायटी आवारात लावले आहेत.
आशिर्वाद सोसायटीच्या अध्यक्षा अमरजीत बग्गा यांनी सांगितले, स्वच्छतेबरोबरच मनोरंजनावर •ार देत आहोत. चांदिवली म्हाडा वसाहतीत सर्वात प्रथम आशिर्वाद सोसायटीने मुख्य प्रवेशद्वारावर पाण्याची टाकी व साबण ठेवून हात धूण्याची व्यवस्था केली. तीनही विंगजवळ लिप्टसाठी आतमध्ये प्रवेश करताना •िांतीवर सॅनिटायझर बाटली ठेवली. याशिवाय प्रत्येक दोन तासानंतर तीनही लिप्टमध्ये, हँन्डल व बटन बोर्ड स्प्रे मारून सॅनिटायझरने निजंर्तूकीकरण केले जाते. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून कंटाळा येऊ नये, सर्व लहानथोरांना जरा विरंगुळा व्हावा म्हणून सोसायटी व्हाटस अप ग्रुपवर नेहा नितीन शहा या सेल्फी गेम, प्रश्न मंजुषा, हाऊजी यासारखे विविध गेम घेतात, जेणेकरून कोणीही सहज फिरायला बाहेर जाणार नाहीत व कोरोना सोसायटीत येणार नाही. एकंदर या सर्व उपक्रमांना स•ाासद व रहिवासी समंजसपणा दाखवून सहकार्य करत आहेत.