मुंबईतील पोलीस वसाहतींमध्ये वाढतेय कोरोनाची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:47 AM2020-04-18T00:47:07+5:302020-04-18T00:47:18+5:30

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ३०, सात अधिकाऱ्यांचा समावेश

 Corona panic is on the rise in police colonies in Mumbai | मुंबईतील पोलीस वसाहतींमध्ये वाढतेय कोरोनाची दहशत

मुंबईतील पोलीस वसाहतींमध्ये वाढतेय कोरोनाची दहशत

googlenewsNext

मुंबई : वरळी पाठोपाठ माहिम, बोरीवली, आर.ए.के. मार्ग आणि भायखळा पोलीस वसाहतीत कोरोनाचे संक्रमण झाल्याने मुंबईतील पोलीस वसाहतींमध्ये भीतीचे सावट आहे. त्यात राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ३० वर पोहचला असून, यात ७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात मुंबईतील सर्वाधिक पोलिसांचा समावेश आहे.

मुंबईत लहानमोठ्या ४६ पोलीस वसाहती आहेत. वरळी पोलीस वसाहतीत कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने तेथील दोन इमारत सील केल्या आणि परिसर निर्जतुक करण्यात आला. त्यानंतर बोरीवली वसाहतीत एका पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. भायखळा पोलीस वसाहतीत काही पोलीस कर्मचाºयांना क्वारंटाइन करण्यात आले. अशात गुरुवारी आर.ए. किडवाई पोलीस वसाहतीत एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाचा संसर्ग झाला. ते विशेष शाखा एकमध्ये कार्यरत आहेत. तर माहिम पोलीस वसाहतीत राहणारे खार पोलीस ठाण्यातील एक पोलीस कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने ते राहत असलेली इमारत सील करण्यात आली. तसेच सबंधित पोलिसांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांनाही होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. राज्यभरात शुक्रवारी पहाटेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ३० पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यात सात अधिकाºयांचा समावेश आहे. हा वाढता आकडा पोलीस कुटुंबियाची चिंता वाढवत आहे. त्यामुळे अनेकजण घरी जाणे टाळत आहेत.

पोलिसांवर हल्ले सुरूच
लॉकडाउनसह विविध आदेशांची अंमलबजावणी करणाºया पोलिसांवर राज्यात अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत. गेल्या ४८ तासांत २१ घटनांची वाढ होत हा आकडा १०२ वर पोहचला आहे. यात लातूर, पालघर, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपुर, बीड, सातारा, पुणे ग्रामीणमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे.

Web Title:  Corona panic is on the rise in police colonies in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.