Join us

बीकेसीतील कोरोना रुग्ण वरळीला आणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:36 AM

एमएमआरडीए मैदानात कोरोना केंद्र गेल्याच महिन्यात सुरू करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार मुंबईत पावसासह ‘निसर्ग’ चक्रीवादळाची किंवा वारा जोराने वाहण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून मुंबईत कोरोना रुग्णांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कोविड काळजी केंद्राची तपासणी करण्यात येत आहे. तर काही केंद्रांतून रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) केअर सेंटरमधील अडीचशे रुग्णांना वरळीतील केंद्रात हलविण्यात आले.

एमएमआरडीए मैदानात कोरोना केंद्र गेल्याच महिन्यात सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रातील सफेद रंगाचे तंबू हे जर्मन तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले आहे. ताशी शंभर किलोमीटर वेगाने वारा वाहिल्यास त्याचा परिणाम या केंद्रावर होणार नाही. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळाचा वेग ताशी १२५ किलोमीटर असणार आहे. परिणामी, खबरदारी म्हणून रुग्णांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस