Join us

Coronavirus: तब्बल ६० तासानंतर थेट स्मशानभूमीत कुटुंबाला बेपत्ता कोरोना रुग्णाचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 5:45 PM

याठिकाणी ६२ वर्षीय वृद्ध महिला ज्ञानती देवी यांचा मृतदेह कोरोना सेंटरमधून गायब होऊन थेट स्मशानभूमीत सापडला. वांद्रे येथील कोविड सेंटरमध्ये या महिलेला दाखल करण्यात आलं होतं

ठळक मुद्देबेपत्ता कोरोना रुग्णाचा मृतदेह थेट स्मशानभूमीत सापडलातब्बल ६० तासानंतर कुटुंबाला दिली प्रशासनाने माहिती मुंबईतील तिसरी धक्कादायक घटना, वांद्रे कोविड सेंटरमध्ये केलं होतं दाखल

मुंबई – देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. शहरात कोरोना संक्रमण रोखण्यास राज्य सरकारला अपयश आल्याचं दिसून येते, कोरोना रुग्णांच्या संख्येत मुंबईने आता चीनला मागे टाकलं आहे. अशातच काही ठिकाणी कोरोना रुग्ण हॉस्पिटलमधूनच गायब होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. मुंबईच्या वांद्रे येथून अशीच घटना समोर आली आहे.

याठिकाणी ६२ वर्षीय वृद्ध महिला ज्ञानती देवी यांचा मृतदेह कोरोना सेंटरमधून गायब होऊन थेट स्मशानभूमीत सापडला. वांद्रे येथील कोविड सेंटरमध्ये या महिलेला दाखल करण्यात आलं होतं तत्पूर्वी कुटुंबाने ५ रुग्णालयाच्या चकरा मारल्या होत्या. शेवटी २ जून रोजी वांद्र्याच्या कोविड सेंटरमध्ये तिला दाखल करण्यात आले. ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे याठिकाणच्या रुग्णांना हटवण्यात आले, येथील रुग्णांना मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रशासनाने याची सूचना रुग्णांच्या कुटुंबाला दिली नाही.

याच दरम्यान ज्ञानती देवी यांचा मृत्यू झाला, जोपर्यंत प्रशासनाने कुटुंबाला माहिती दिली तोवर ६० तास होऊन गेले होते, ज्ञानती देवी यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला होता, कुटुंबाच्या माहितीनुसार जर १० मिनिटं उशीर झाला असता तरी ज्ञानती यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनही त्यांना घेता आलं नसतं असा आरोप कुटुंबाने केला. तसेच ज्ञानती देवी यांची नातू संदीप म्हणाले की, ते आपल्या आजीच्या उपचारासाठी जानेवारी महिन्यात मुंबईला आले होते, १ जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केले, परंतु ती वाचली नाही. स्मशानभूमीत तीन मृतदेह होते, त्यातील दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि शेवटचा मृतदेह आमच्या आजीचा होता असं त्याने सांगितले.  

तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकानजीक आढळून आला होता. वृद्धाच्या कुटुंबीयांनी मालाड, बोरिवली आणि कांदिवली पोलीस ठाण्यात हरवलेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बोरिवली रेल्वे स्थानकानजीक सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली होती. तसेच केईएम रुग्णालयातून ७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण गायब झाला होता. तब्बल १५ दिवसांच्या शोधकामानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

होय, चीननं भारताच्या ‘या’ जमिनीवर कब्जा केलाय; लडाखमधील भाजपा खासदारानं दिली यादी

Video:...अन् मनसे नेत्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर; रुग्णालयातील बिकट परिस्थितीचा भयावह अनुभव

Parle G: स्वदेशी आंदोलनातून मिळाली प्रेरणा; जगात गाजणाऱ्या बिस्किट कंपनीचा ‘असा’ आहे इतिहास!

...म्हणून येत्या १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता राज्य सरकारविरोधात मनसे करणार आंदोलन

 ‘या’ तारखेपासून राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार; सूत्रांची माहिती

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई