कोरोनाचा प्रश्न सुटेल, वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही - अशोक दातार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 01:46 AM2020-10-31T01:46:25+5:302020-10-31T01:47:02+5:30
Traffic Parking News : मुंबईत दसऱ्यानिमिवाहन उद्योग क्षेत्राला कोरोनाच्या झळा बसल्या होत्या. मात्र त्त होणाऱ्या वाहन खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबईत दसऱ्यानिमिवाहन उद्योग क्षेत्राला कोरोनाच्या झळा बसल्या होत्या. मात्र त्त होणाऱ्या वाहन खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. दरवर्षी ८ टक्के वाहने वाढत आहेत तर रस्त्यावरील पार्किंग दुप्पट ते तिप्पट वाढत आहे.
त्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे. एकवेळ कोरोनाचा प्रश्न सुटेल पण वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही, असे मत वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत दातार म्हणाले, गेल्या २० वर्षांत वाहने मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न वाढत आहे. यंदाही वाहनांच्या संख्येत भर पडली आहे. एकवेळ कोरोनाचा प्रश्न सुटेल, पण हा प्रश्न सुटणे अवघड आहे. पार्किंगचा प्रश्न सोडविल्याशिवाय आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक वाढणार नाही. आज कोरोनाचा प्रश्न आहे, पण सर्वांना मास्क घालून रेल्वे प्रवास करू दिल्यास खाजगी वाहने कमी होतील. मुंबईत ४ हजार शाळेच्या बस आहेत त्या मुंबई ते डोंबिवली, कल्याण यासारख्या ठिकाणी वापरल्या असत्या तर बाहेरून एसटीच्या बसेस आणण्यापेक्षा हे योग्य ठरले असते. आज आपण रस्त्यावर फेरीवाल्यांनी जागा अडवली म्हणून आपण बोंबाबोंब करतो पण पार्किंगमुळे फेरीवाल्यांपेक्षा २० पट जास्त जागा अडवली जाते असेही ते म्हणाले.
वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर
दरवर्षी वाहन खरेदीत वाढ होत आहे. लॉकडाऊन काळात कमी झालेली वाहतूक आता नियम शिथिल झाल्यावर ७० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. आधीच मुंबईत रस्त्यांची कामे सुरू आहेत वाहतुकीला जागा कमी आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेत सर्वसामान्यासाठी सुरू नाही, बसमध्येही गर्दी असते त्यामुळे अनेकजण खाजगी वाहने घेत आहेत. नवीन वाहनांमुळे वाहतुककोंडीत आणखी भर पडत आहे असे वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पार्किंगसाठी पैसे आकारावे
वाहने घेण्यात मध्यमवर्गीयांचे प्रमाण जास्त आहे. एका वाहनाला साधारण १५० चौरस फूट जागा लागते. ते एका घराला जर १५ हजार रुपये भाडे देत असतील तर पार्किंगसाठी दोन हजार भाडे देण्यास काय हरकत आहे? पार्किंगमुळे खूप जागा अडली आहे. पाश्चात्त्य देशांत पार्किंगसाठी पैसे आकारतात त्याप्रमाणे आपल्याकडे आकारायला हवेत.