कोरोना : १९०० केंद्राद्वारे ३६ जिल्ह्यात मिळते आहे अत्यावश्यक सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 12:19 PM2020-03-30T12:19:23+5:302020-03-30T12:24:34+5:30

१९०० पैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त आउट लेट्स ही ग्रामीण भागात आहेत.

Corona: Provides urgent service in 36 districts through 1900 centers | कोरोना : १९०० केंद्राद्वारे ३६ जिल्ह्यात मिळते आहे अत्यावश्यक सेवा

कोरोना : १९०० केंद्राद्वारे ३६ जिल्ह्यात मिळते आहे अत्यावश्यक सेवा

googlenewsNext

कोरोना : १९०० केंद्राद्वारे ३६ जिल्ह्यात मिळते आहे अत्यावश्यक सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ग्रामीण, अर्ध-शहरी आणि शहरी बाजारपेठांमध्ये रिअल टाईम एटीएम, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स सेवा देण्यासाठी एका कंपनीने देशाच्या कानाकोपऱ्यात रिटेल आउट लेट्सचे नेटवर्क तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सहाय्य डिजिटल सुविधा स्टोअर असे त्यास संबोधले जात असून या केंद्राच्या माध्यमातून विविध सेवा आणि उत्पादनांचा लाभ घेता येत आहे.

कोरोनाला थोपविण्यासाठी देशभरात २१ दिवस लॉक डाऊन करण्यात आले आहे. यातून अत्यावश्यक सेवा प्रदान करणारी आस्थापने जसे की बँकिंग आणि एटीएम, पिण्याचे पाणी व सांडपाणी, अन्न व किराणा सामान, रुग्णालये, मेडिकल  स्टोअर व केंद्रे, दूरध्वनी व इंटरनेट सेवा यासारख्या सेवा पुरविणाऱ्या  संस्थांना वगळण्यात आले आहे. ही वक्रांगी केंद्रे त्यातीलच एक असून जी वन स्टॉप दुकाने आहेत. ज्यात आवश्यक सेवा पुरविण्यात येत आहे. यात बँकिंग सेवा, एटीएम सेवा, ऑनलाइन फार्मसी, टेलिमेडिसिन आरोग्य सेवा- तज्ञ डॉक्टर आणि गृह रक्त तपासणी सुविधेसह अमर्यादित टेली आणि किराणा मालाच्या ऑनलाईन खरेदीचा समावेश आहे. दरम्यान या १९०० पैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त आउट लेट्स ही ग्रामीण भागात आहेत. तर मूलभूत आणि आवश्यक सेवा पुरविण्यासाठी आणि अशा प्रकारे देशाची सेवा करण्यासाठी एकूणच १० हजार पेक्षा अधिक केंद्रे संपूर्ण भारतभर कार्यरत आहेत.

 

Web Title: Corona: Provides urgent service in 36 districts through 1900 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.