कोरोना : रिअल इस्टेटही टेक्नोसॅव्ही, ग्राहकांना आभासी प्रदर्शनाची भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 03:45 PM2020-10-30T15:45:20+5:302020-10-30T15:51:09+5:30

Real estate : आभासी प्रदर्शनाचा आधार

Corona: Real estate is also technosavvy, offering virtual display to customers | कोरोना : रिअल इस्टेटही टेक्नोसॅव्ही, ग्राहकांना आभासी प्रदर्शनाची भुरळ

कोरोना : रिअल इस्टेटही टेक्नोसॅव्ही, ग्राहकांना आभासी प्रदर्शनाची भुरळ

googlenewsNext

मुंबई : कोरोनामुळे प्रत्यक्ष भेटी गाठी शक्य होत नाहीत. त्यामुळे अधिकाधिक गोष्टी आभासी पद्धतीने तंत्राच्या माध्यमातून साज-या केल्या जात आहेत. कोरोनाचा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसला असून, आता ग्राहकांना नव्या प्रकल्पालाची माहिती देण्यासह घर घेण्याकरिता आकर्षित करण्यासाठी आभासी प्रदर्शनाचा आधार घेतला जात आहे. देशभरात अशी आभासी प्रदर्शने आयोजित केली जात असून, आता मुंबईसहमहाराष्ट्रात देखील रिअल इस्टेट क्षेत्रात आभासी प्रदर्शन आयोजित करण्यावर भर दिला जात आहे.

कोरोनामळे घरबसलया काम केले जात आहे. याच काळात इंटरनेटच्या वापरता वाढ झाली आहे. या व्यतीरीक्त अत्याधुनिक तंत्रांचा वापर केला जात आहे. साहजिकच आता व्यापार आणि उददीम क्षेत्रही टेक्नोसॅव्ही झाले आहे. तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण वापराने व्यापार आणखी समृद्ध होत आहे. बाजारपेठ आणि व्यवसाय ज्याने कधीही कल्पनाही केली नसतील अशा प्रकारे आभासी तंत्र वापरले जात आहे. मुंबईत देखील आता घरांसाठी आभासी प्रदर्शन आयोजित केली जात आहेत. ऑनलाइन रिअल इस्टेट एक्सपोला भेट देणा-यांना याद्वारे मजेदार आणि मनोरंजक अनुभव घेता येत आहे. लॅपटॉपपासून मोबाईल फोन आणि टॅबलेटचा वापर करत इव्हेंटमध्ये प्रवेश करता येतो. व्हर्च्युअल स्पेसचा विचार करता फ्लॅटमध्ये जाता येते. व्हिडिओ गेमप्रमाणेच किंचित अनुभव येथे येतो, असे या क्षेत्रातील तज्ञ ओमकार जगदाळे यांनी सांगितले.

दुसरीकडे रिअल इस्टेटची मागणी स्थिर असली तरी ग्राहक आभासी मार्गाने घराणं भेटी देत आहेत. बदलत्या काळाशी जुळवून घेणे क्रमप्राप्त असल्याने बाजारपेठा आणि ग्राहक देखील तंत्राचा वापर करत आहेत, असे राजीव द्विवेदी यांचे म्हणणे आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून संभाव्य घर खरेदीदारांना प्रकल्प पाहता येतात. दरम्यान, केवळ रिअल इस्टेट नाही तर शिक्षण, पर्यावरण, आरोग्य या क्षेत्रासह प्रशासन देखील आभासी पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यावर भर देत आहे.  

Web Title: Corona: Real estate is also technosavvy, offering virtual display to customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.