मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. नवनीत राणा यांच्या तब्येतीत शनिवारी सुधारणा झाली. त्यांना अतिदक्षता विभागामधून बाहेर हलवले होते. त्यानंतर प्रकृती सुधारल्याने रवी राणा यांना शनिवारी आणि नवनीत राणा यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा यांच्यासह रवी राणा यांची कोरोनाची चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने दोघांनाही होम क्वारंटाईन राहण्यास सांगतिले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईत होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे.
नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सासू, सासरे, दोन मुले, आमदार राणा यांचा समावेश आहे. ६ ऑगस्टपासून नवनीत राणा व त्यांच्या पतीवर नागपूर वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर १३ ऑगस्टला नागपूरहून त्यांना व त्यांच्या पतीला वांद्रेतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले होते.
२३ तासांचा प्रवास करून नवनीत राणा १४ ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचल्या होत्या. त्यानंतर, शनिवारी १५ ऑगस्टला त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानं त्यांना आयसीयूमधून सामान्य कक्षात आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी व्हिडीओमधून आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली होती. "आज मला आयसीयूमधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे, आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार" असे नवनीत राणा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होतं. तसेच प्रकृती सुधारल्याने शनिवारी रात्री उशिरा दोघांनाही लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या-
...तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण
माफी मागा अन्यथा...; सुशांतच्या भावाचा संजय राऊत यांना स्पष्ट इशारा
गोव्याच्या राज्यपालांची मेघालयात बदली; भगतसिंह कोश्यारींकडे अतिरिक्त पदभार
कौतुकास्पद! बैरुत स्फोट पीडितांसाठी मिया खलिफाकडून खास वस्तूचा लिलाव; ७५ लाखांची लागली बोली