भटजींना कोरोना सुरक्षा कवच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:55 PM2020-08-21T16:55:48+5:302020-08-21T16:56:11+5:30

कोरोनामुळे यंदाची परिस्थिती वेगळी आहे.

Corona safety shield to Bhatji | भटजींना कोरोना सुरक्षा कवच

भटजींना कोरोना सुरक्षा कवच

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई : दरवर्षी गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेला भटजींची लगीनघाई असते. गणेशोत्सवात घरगुती व सार्वजनिक पूजा सांगण्यासाठी भटजी आधीच बुक झाले असतात. तर गणेश चतुर्थीला पहाटे 4 पासून ते दुपार पर्यंत घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या हातून होत असते. परंतू कोरोनामुळे यंदाची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनाच्या भीतीमुळे भटजी यंदा घरगुती व सार्वजनिक पूजा सांगायला राजी नाही. तुम्ही व्हिडिओ कॉल करा,आम्ही ऑनलाईन पूजा सांगतो,आमची दक्षिणा मात्र आमच्या वॉट्सअपवर दिलेल्या खात्यात जमा करा असा काहीसा पूजेचा  ट्रेंड यंदा आहे.

भटजींची कोरोनाची भीती दूर होण्यासाठी आणि त्यांनी उद्या दरवर्षी प्रमाणे त्यांच्या ठरलेल्या घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करावी ही संकल्पना शिवसेनेचे गोरेगाव विधानसभा मतदार संघाचे  संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मांडली. धार्मिक विधी सुरक्षितरित्या व सरकारी नियमांचो पालन करत गणपती व गौरी पूजन विधीवत पार पाडण्यासाठी भटजींना कोरोनापासून सुरक्षा करणारे साहित्य प्रदान करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. अश्या प्रकारची ही मुंबईसह राज्यातील पहिलीच संकल्पना असल्याचे दिलीप शिंदे यांनी सांगितले.

उद्योग मंत्र्यांच्या शुभहस्ते आज प्रबोधन गोरेगाव येथे
झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात गोरेगावतील 51 भटजींना शिवसेनेने दिले कोरोना सुरक्षा कवचाचे वाटप करण्यात आले. यामध्ये गोरेगावतील मराठी,हिंदी,दाक्षिणात्य अश्या सुमारे 51 भटजींना मास्क,शिल्ड,सॅनिटायझर,हॅन्ड ग्लोज, सोवळे,टोपी,उपरणे आदींचा समावेश असलेले सुरक्षा कवच देण्यात आले. उद्यापासून गोरेगाव शिवसेनेने तुम्हाला दिलेल्या सुरक्षा कवचाचा उपयोग करून विधीवत गणेशाची पूजा करा,मुंबई,महाराष्ट्र व देशाला लवकर कोरोनामुक्त करा अशी मनोभावे गणेशाकडे प्रार्थना करा तसेच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे,त्याठिकाणी जाण्याचे टाळा असे आवाहन सुभाष देसाई यांनी यावेळी उपस्थित भटजी मंडळींना केले. तर उपस्थित सर्व भटजींच्या वतीने मान्यवरांचे व आयोजकांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

सदर सामाजिक कार्यक्रमाला विधानसभा उपसमन्वयक  अजय नाईक, विधानसभा संघटक राजु पाध्ये, रायगड व पालघर जिल्हा समन्वयक  शशांक कामत उपविभागप्रमुख  लक्ष्मण नेहरकर, शाखाप्रमुख  भरत बोऱ्हाडे, कमलाकांत नांदोस्कर, उपशाखाप्रमुख बाळा सोनवणे, संदिप लाखण, उपकक्षप्रमुख जितेंद्र इंगळे, शिवसैनिक महेश करमरकर, विजय अहिरे, महेंद्रा इंगवे, कांता सावंत, राजेश गावडे,संतोष परब,राजू बोवलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: Corona safety shield to Bhatji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.