केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यावर कोरोनाचे सावट; जेएनपीटीतील प्रकल्पांचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:34 AM2020-03-14T02:34:30+5:302020-03-14T02:35:01+5:30

कार्यक्रम अनिश्चिततेच्या गर्तेत, अधिकारीही संभ्रमात

Corona Sawat visits Union ministers; Inauguration of projects at JNPT | केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यावर कोरोनाचे सावट; जेएनपीटीतील प्रकल्पांचे उद्घाटन

केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यावर कोरोनाचे सावट; जेएनपीटीतील प्रकल्पांचे उद्घाटन

Next

उरण : केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांच्या शनिवार, १४ मार्च रोजी आयोजित केलेल्या जेएनपीटी दौºयात शिवस्मारकासह विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, जेएनपीटीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर सध्या कोरोनाचे सावट आहे. यामुळे मंत्र्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम अनिश्चिततेच्या गर्तेत आहे.

जेएनपीटीने बंदरातून होणाºया वाढत्या तस्करीला पायबंद घालण्यासाठी बंदरात मोबाइल एक्सरे कंटेनर स्कॅनरची सुविधा उभारली आहे. तसेच जेएनपीटी यार्डमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून २२०-३३३ केव्ही वॅट क्षमतेचे सबस्टेशनही उभारले आहे. पीयूबीशेजारील जेएनपीटी मार्गावरील वाय जंक्शनवर उभारण्यात आलेला एक किमी लांबीचा फ्लायओव्हर ब्रिज आणि ३२ कोटी खर्चून बांधलेले शिवस्मारक मेमोरियल म्युझियम आदी विविध प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत.

जेएनपीटीच्या पूर्णत्वास गेलेल्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर ठाणे जिल्ह्यातील भाईंदर ते भिवंडीदरम्यान प्रस्तावित रो-रो सेवा प्रकल्पावरही मंत्री मांडवीया आणि जेएनपीटी अधिकारी यांच्यात चर्चा होणार आहे. मात्र सध्या देशभरातील कोरोनाच्या भीतीने या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मंत्री उपस्थित राहणार की नाहीत? याबाबत जेएनपीटीचे अधिकारी संभ्रमात आहेत.

ईमेलची प्रतीक्षा
विविध प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. मात्र कोरोनाचे सावट असल्याने मंत्र्यांच्या होकाराच्या प्रतीक्षेत जेएनपीटी प्रशासन आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मंत्र्यांच्या कार्यक्रम निश्चित-अनिश्चिततेबाबत संबंधित मंत्रालयाकडून येणाºया ईमेलची वाट पाहत आहोत. - जयंत ढवळे, सचिव तथा वरिष्ठ प्रबंधक, जेएनपीटी

Web Title: Corona Sawat visits Union ministers; Inauguration of projects at JNPT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.