उल्हासनगरात लंडनहून आलेल्या सात वर्षांच्या मुलीला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:08 AM2020-12-30T04:08:44+5:302020-12-30T04:08:44+5:30
उल्हासनगर : लंडनहून आलेल्या सात वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले असून सतर्कता म्हणून मुलीसह कुटुंबाला घरीच क्वारंटाइन ...
उल्हासनगर : लंडनहून आलेल्या सात वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले असून सतर्कता म्हणून मुलीसह कुटुंबाला घरीच क्वारंटाइन केल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली.
लंडनमधून गेल्या आठवड्यात एकूण १३ प्रवासी उल्हासनगरमध्ये आल्याची यादी शासनाने महापालिका प्रशासनाला देऊन सतर्क राहण्यास सांगितले. आरोग्य विभागाने त्या सर्वांची कोरोना टेस्ट केली असता, सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. रिजवानी यांनी दिली. तसेच सर्वांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले. तसेच त्यांचे स्वॅब दुसऱ्या कोरोना चाचणीसाठी पुणे येथे पाठविल्याचे सांगण्यात आले. सात वर्षांच्या एका मुलीला कोरोनाची लागण झाली असल्याचा एका खासगी लॅबचा अहवाल तिच्या पालकांनी डॉ. पगारे यांना दिला. सतर्कता म्हणून वैद्यकीय पथक मुलीच्या घरी पाठविले.
मुलीच्या आईवडिलांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याची माहिती डॉ. पगारे यांनी दिली.