Join us

Uddhav Thackeray: कोरोना, वादळ, लॉकडाऊन अन् निर्बंध; उद्धव ठाकरेंच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 9:44 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवारी) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला होता. त्याचा सर्वात मोठा महाराष्ट्रालाही बसला होता. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही कमी झालेला नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवारी) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

  • तौक्ते चक्रीवादळात प्रशासनानं चांगलं काम केलं.
  • वादळानं आपल्याला मोठा फटका दिला. या वादळाची माहिती मिनिटा मिनिटाला मी घेत होतो. 
  • आपण गेल्यावेळी लावलेल्या निकषांप्रमाणेच मदत देणार आहोत.
  • ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे. 
  • राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याची मला चिंता वाटते आहे.
  • १२ कोटी डोस घेण्याची राज्याची तयारी.
  • राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढलं आहे. 
  • लॉकडाऊन असला तरी, अर्थचक्र चालू राहिलं पाहिजे.
  • आपलं गाव कोरोनापासून मुक्त करणार, असा निश्चय करा.
  • येत्या काळात लसीकरणाचा वेग वाढवणार.
  • काळी जादू माहिती होती, आता काळी बुरशी असा आजार आलेला आहे.
  • बारावीच्या परिक्षेबाबत केंद्रानं धोरण ठरवायला हवं; केंद्राने याबाबत आम्हाला सहकार्य करा.
  • लहान मुलांमधील कोविडसंदर्भात बाल रोग तज्ञांचा टास्क फोर्स
  • कोरोनाची साथ खूप वाईट आहे.
  • कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार.
  • आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेवर निर्बंध लादणं हे खूप कटू काम.
  • महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार.
  • १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येणार.

 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस