Join us

राज्यभरात २४ तासांत ३०३ पोलिसांना कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 5:00 PM

कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यूचा आकडा १२५ वर

कोरोनाबाधित पोलिसांचामृत्यूचा आकडा १२५ वर

मुंबई : अनलॉकच्या टप्प्यात राज्यभरात दिवसागणिक २०० ते ३०० पोलिसांना कोरोनाची बाधा होत असल्याची परिस्थिती कायम असून गेल्या २४ तासांत यात आणखीन ३०३ कोरोनाबाधित पोलिसांची भर पडली. तर आतापर्यंत कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यूचा आकडा १२५ वर गेला आहे.

अत्यावश्यक सेवेत असल्याने पोलिसांना घरबसल्या काम करण्याची मुभा नाही. त्यामुळे लॉकडाऊन, जमावबंदी आदेशाच्या अंमलबजावणीसह महापालिकेच्या  रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या, नातेवाईकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधींपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वारंटाईनचे शिक्के असलेल्या व्यक्ती स्थानबद्ध आहेत ना याची खातरजमा, शिवाय कोरोनाची लागण  झालेल्या वस्त्या किंवा इमारती पालिकेने ताब्यात घेतल्यानंतर तेथील बंदोबस्त आदी सर्वच जबाबदाºया पोलिसांवर आहेत. 

जून महिन्याच्या अखेरीस कमी झालेल्या आकड्याने अनलॉकच्या टप्प्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली.  अनलॉकच्या काळात राहदारी वाढली. नागरिकांशी संपर्क वाढल्याने पोलिसांभोवतीचे संकटही वाढताना दिसत आहे. राज्यभरात १६ ऑगस्ट पर्यन्त १२ हजार २९० पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात १ हजार २७७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ९८० अधिकाऱ्यांसह ९ हजार ८५० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. पोलिसांभोवतीचा कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढविणारा आहे. यात गेल्या २४ तासांत तब्बल ३०३ पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकले.  सध्या २८६ अधिकारीसह एकूण २ हजार ३१५ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मृत्यूचा आकडा १२५ वर पोहचला आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

........................

अंमलबजावणी करणारेच होताहेत टार्गेट : दुसरीकडे अंमलबजावणी करणारेच टार्गेट होतानाचे चित्र पहावाययास मिळते आहे. आतापर्यंत पोलिसांवरील हल्ल्यांप्रकरणी ३३३ गुह्यांची नोंद झाली असून, याप्रकरणी ८८८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ८९ पोलीस जखमी झाले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापोलिसमृत्यूमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस