मातोश्रीनंतर आता वर्षा बंगल्यावरील महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 09:29 PM2020-04-21T21:29:07+5:302020-04-21T21:33:18+5:30

काही दिवसापूर्वी मातोश्री बंगल्याजवळचा एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

Corona suffers from female police officer at Varsha Bungalow after Matoshree pda | मातोश्रीनंतर आता वर्षा बंगल्यावरील महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण 

मातोश्रीनंतर आता वर्षा बंगल्यावरील महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण 

Next
ठळक मुद्देसध्या मुख्यमंत्री या बंगल्यात वास्तव्यास नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वांद्र्यातील मातोश्री या निवासस्थानी राहतात. वर्षा बंगल्यावरील संबंधित महिला पोलीस अधिकारी परिमंडळ - २मधील पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

मुंबई - मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर  बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या महिला अधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिला अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. सध्या मुख्यमंत्री या बंगल्यात वास्तव्यास नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वांद्र्यातील मातोश्री या निवासस्थानी राहतात. काही दिवसापूर्वी मातोश्री बंगल्याजवळचा एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे खळबळ माजली होती. 

वर्षा बंगल्यावरील संबंधित महिला पोलीस अधिकारी परिमंडळ - २मधील पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी त्यांना वर्षा बंगल्यावर तैनात करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या संपर्कातील इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं. महिला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.

राज्यात ४९ पोलिसांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील ४९ पोलिसांना कोरोना लागण झाली आहे. यामध्ये ११ अधिकारी आणि ३८ पोलीस कर्मचाऱ्यांचं समावेश आहे. २२ मार्चपासून आतापर्यंत ४९ पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

Web Title: Corona suffers from female police officer at Varsha Bungalow after Matoshree pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.