CoronaVirus News: आरोग्य विमा असूनही कोरोना रुग्णांच्या खिशाला भुर्दंड; उपचार खर्चाचा ४० टक्के भार रुग्णांच्या माथी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 02:25 AM2020-07-25T02:25:02+5:302020-07-25T06:39:02+5:30

आरोग्य विमा देणाऱ्या कंपन्यांकडे ७ जुलैपर्यंत ३४ हजार ३०० रुग्णांचे ५६० कोटींचे क्लेम दाखल झाले होते.

Corona suffocates patients' pockets despite health insurance! | CoronaVirus News: आरोग्य विमा असूनही कोरोना रुग्णांच्या खिशाला भुर्दंड; उपचार खर्चाचा ४० टक्के भार रुग्णांच्या माथी

CoronaVirus News: आरोग्य विमा असूनही कोरोना रुग्णांच्या खिशाला भुर्दंड; उपचार खर्चाचा ४० टक्के भार रुग्णांच्या माथी

Next

- संदीप शिंदे 

मुंबई : कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्या उपचारांच्या खर्चातही वाढ होताना दिसत आहे. मात्र, आरोग्य विमा असतानाही उपचारांवरील सुमारे ४० टक्के खर्च रुग्णांना आपल्या खिशातून करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. २१ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार प्रति रुग्ण सरासरी क्लेम १ लाख ६१ हजार ७१४ रुपयांचे होते, तर त्यापोटी रुग्णांना मंजूर झालेली परताव्याची रक्कम सरासरी ९९ हजार ६६४ रुपये असल्याचे आकडेवारी सांगते.

आरोग्य विमा देणाऱ्या कंपन्यांकडे ७ जुलैपर्यंत ३४ हजार ३०० रुग्णांचे ५६० कोटींचे क्लेम दाखल झाले होते. १५ दिवसांत रुग्णसंख्या ६० हजार ९०६ तर क्लेम केलेली रक्कम ९८४ कोटींवर झेपावली आहे. गेल्या १५ दिवसांत दररोज सरासरी १ हजार ७७३ रुग्णांचे क्लेम विमा कंपन्यांकडे दाखल होत आहेत. २१ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार ६० हजार ९०६ पैकी ३६ हजार ३११ रुग्णांचे क्लेम मंजूर झाले आहेत.

क्लेमसाठी दाखल एकूण रक्कम ९८४ कोटी असून अदा झालेली रक्कम ३३७ कोटी इतकी आहे. क्लेम केलेल्या आणि मंजूर झालेल्या रकमेची सरासरी काढल्यानंतर उपचार खर्चातील जेमतेम ६० टक्के रक्कमच रुग्णांना परत मिळाल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारादरम्यान पीपीई किटसह अन्य कन्झुमेबल गुड्सचा परतावा विमा कंपन्यांकडून दिला जात नव्हता. अ‍ॅम्ब्यूलन्स भरमसाट पैसे उकळत असताना विमा कंपन्यांनी त्यावरही निर्बंध घातले आहेत. अनेक महागडी औषधे बाहेरून आणावी लागत होती. त्याचा परतावा मिळवणे अवघड जाते. याशिवाय कंपन्यांनी अन्य अटी-शर्तींचा बडगा उगारत परताव्याच्या रकमेला कात्री लावली होती. त्यामुळे ४० टक्के रकमेचा भार रुग्णांच्या खांद्यावर येत असल्याची माहिती विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली.

पाच कंपन्यांकडेच ७३ टक्के क्लेम

सर्वाधिक ११ हजार ९१३ क्लेम युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडे दाखल झाले आहेत. त्याखालोखाल न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स (१०,५६७), स्टार हेल्थ (९,८०९), ओरिएण्टल (६१८१), नॅशनल इन्शुरन्स (६१८७) या कंपन्यांचा क्रमांक लागतो. ३० कंपन्या आरोग्य विमा देत असल्या तरी या पाच प्रमुख कंपन्यांकडेच कोरोना क्लेमचा ७३ टक्के वाटा आहे.

नव्या धोरणामुळे परतावा वाढेल

च्कन्झुमेबल म्हणून विम्याच्या कक्षेबाहेर असलेल्या पीपीई किटच्या खर्चाचाही परतावा आता रुग्णांना मिळू लागला आहे. प्रतिदिन तीन याप्रमाणे प्रत्येक किटचे ६५० रुपये मंजूर केले जात आहेत. होम आयसोलेशनचे क्लेम २० हजारांपर्यंत दिले जाणार आहेत. तसेच, हॉस्पिटलची बिले तिथल्या दरपत्रकानुसार मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे.

च्स्टाफ मॅनेजमेंट चार्जेस, इन्फेक्शन कंट्रोल, एअर प्युरिफायर, स्पेशल डिस्पोजेबल किट, सेफ्टी प्रोटोकॉल, फेस मास्क, सॅनिटायझेशन, ग्लोव्हज, बायो मेडिकल वेस्ट यापोटी आकारल्या जाणाºया शुल्काचा परतावा मात्र मिळणार नाही. विमा कंपन्यांच्या सुधारित धोरणामुळे क्लेमच्या परताव्याची रक्कम वाढेल, असा आशावाद कंपनीच्या प्रतिनिधींकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: Corona suffocates patients' pockets despite health insurance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.