मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीच्या नावे घोटाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 07:52 AM2022-01-05T07:52:39+5:302022-01-05T07:52:50+5:30
लंडनहून निघण्याच्या तीन तास आधी त्याने चाचणी केली होती. ती निगेटिव्ह आली. मात्र, मुंबईत उतरल्यानंतर केलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रिटनहून आलेल्या एका प्रवाशाने मुंबई विमानतळावर कोविड चाचणीच्या नावे घोटाळा सुरू असल्याचा आरोप केला आहे. लंडनहून निघण्याच्या तीन तास आधी त्याने चाचणी केली होती. ती निगेटिव्ह आली. मात्र, मुंबईत उतरल्यानंतर केलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे चाचणी प्रक्रियेवर शंका आल्याने त्याने दुबार चाचणी करण्याची विनंती केली. मात्र मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यास नकार केला.
मनोज लाडवा हे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी ब्रिटनहून आला होता. प्रवास सुरू होण्याच्या तीन तास आधी लंडनच्या हीथ्रो विमानतळावर त्याने कोरोना चाचणी केली होती. त्यात तो निगेटिव्ह आढळून आला.
आरोप वस्तुस्थितीला धरून नसून, पूर्णपणे चुकीचे!
n३० डिसेंबरला लंडनहून मुंबई विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाने कोविड चाचण्यांबाबत आरोप केल्याचा व्हिडीओ
समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यातील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून, पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत.
nया प्रवाशाने दिलेल्या स्वयंघोषणापत्रानुसार आणि स्वत: निवडलेल्या कोविड चाचणीच्या पर्यायानुसार मुंबई पालिकेद्वारे कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे या तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाकडून देण्यात आले.