नेस्को कोविड केंद्रात संशयित रुग्णाच्या आवाजावरून कोरोना चाचणी करणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 01:04 AM2020-08-24T01:04:21+5:302020-08-24T07:07:21+5:30

या यंत्रणेद्वारा व्यक्तीच्या किंवा संशयित रुग्णाच्या आवाजावरून त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होईल.

Corona test from sound at Nesco Covid Center | नेस्को कोविड केंद्रात संशयित रुग्णाच्या आवाजावरून कोरोना चाचणी करणे शक्य

नेस्को कोविड केंद्रात संशयित रुग्णाच्या आवाजावरून कोरोना चाचणी करणे शक्य

Next

मुंबई : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जम्बो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे.

या यंत्रणेद्वारा व्यक्तीच्या किंवा संशयित रुग्णाच्या आवाजावरून त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होईल. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा प्रारंभ केला.
प्रायोगिक तत्त्वावरील हा उपक्रम महापालिका अधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या आॅनलाइन उपस्थितीत सुरू करण्यात आला.

‘आरटी-पीसीआर चाचण्या सुरूच राहणार’
कल्पकता आणि अत्याधुनिक अशा या तंत्रज्ञानामुळे मुंबईमधील कोरोनाविरुद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातील कोविड रुग्णांसाठी त्वरित निदान आणि बरे होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी मदत होणार आहे, असे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित या तंत्रज्ञानाच्या आधारे कोरोनाचे निदान लवकर करणे शक्य होणार आहे, पण निदानासाठीच्या आरटी-पीसीआर चाचण्या मात्र सुुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Corona test from sound at Nesco Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.