‘एसटीच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:23 AM2020-04-26T00:23:55+5:302020-04-26T00:23:57+5:30
एसटी कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाऱ्यांची एसटी बसद्वारे ने-आण करत आहेत. त्यामुळे या एसटी कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करणाºया पोलीस, रुग्णालय कर्मचाºयांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणाºया एसटी महामंडळातील एसटी चालक, वाहक व इतर कामगारांची कोरोना चाचणी करण्याची मागणी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेने केली आहे. यासंदर्भात सेनेने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
कोरोनामुळे दुसºया टप्प्यातील लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे सर्व वाहतूक बंद आहे. मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाºया डॉक्टर, पोलीस आणि महानगरपालिका कर्मचारी यांना
ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे व पालघर विभागांतून एसटी बस सुरू आहेत. एसटीचे कर्मचारी ही अत्यावश्यक सेवा बजावत आहेत.
त्यामुळे ज्याप्रमाणे पोलीस, रुग्णालय कर्मचाºयांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याप्रमाणे अत्यावश्यक सेवेत काम करणाºया महामंडळातील एसटी चालक, वाहक व इतर कर्मचाºयांची कोरोना चाचणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेने केली आहे. एसटीचे चालक आणि वाहक महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांच्या संपर्कात येतात. पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये आलेली भीती नाहीशी करण्यासाठी त्यांची कोरोना तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.