धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 06:04 PM2020-07-12T18:04:07+5:302020-07-12T18:07:36+5:30

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

Corona under control due to 800 RSS volunteers in Dharavi, photo sharing, chitra wagh | धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, फोटो शेअर

धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, फोटो शेअर

Next
ठळक मुद्देभाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. भाजपा नेते नितेश राणे यांनीही हे राज्य सरकारचं श्रेय नसल्याचं मत व्यक्त केलं.

मुंबई -  जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO) धारावीतील कोरोना नियंत्रणाचे कौतुक केलं आहे.  WHOचं हे कौतुक म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देणारे आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 22,674 इतकी झाला असून त्यापैकी 5 लाख 16,308 रुग्ण बरे झाले आहेत, तर 22,152 रुणांना प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पण, या संकटात आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना रोखण्यात यश आलं आहे. मात्र, धारावीच्या कौतुकानंतर तेथील श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमुळेच धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आल्याचे म्हटले. 

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह माहिती देताना, राष्ट्रीय स्वयंसेवस संघाच्या 800 स्वयंसेवकांच्या अविरत कार्यामुळेच धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचे त्यांनी म्हटलंय. तसेच, RSS स्वयंसेवकांनी लक्षणीय काम केलं असून धारावीतील लोकांना कोरोनाबद्दल जागृत करणं, अन्नधान्य पुरवणं, यांसारखी महत्वाची कामे केली आहे. या कामादरम्यान काहींना कोरोनाची लागणही झाल्याचे वाघ यांनी नमूद केले आहे. 

यापूर्वी, भाजपा नेते नितेश राणे यांनीही हे राज्य सरकारचं श्रेय नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यांनी ट्विट केलं की,''राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि अन्य सेवाभावी संस्थांनी धारावीच्या अनेक भागांत दिवसरात्र काम केले. त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही. त्यांच्या मेहनतीमुळे धारावी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचे श्रेय हे महाराष्ट्र सरकारला देणं हे त्या संस्थांवर अन्याय करण्यासारखं आहे.'', असे नितेश राणेंनी म्हटले होते. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धारावीचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याचं म्हटलं होतं. मात्र, भाजपा नेत्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी प्रत्युत्तरही दिलंय.  

दरम्यान, धारावी परिसर कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.  WHOचे महासंचालक म्हणाले की, 'जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे. यापैकी काही उदाहरणे इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आणि धारावीमध्येही आढळतात. मुंबईतील या झोपडपट्टी परिसरातील लोकांची चाचणी, ट्रेसिंग, सामाजिक अंतर आणि संक्रमित रुग्णांवर त्वरित उपचार करण्याच्या पद्धतीमुळे धारावी कोरोनावर विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. डब्ल्यूएचओ महासंचालकांनी धारावी मॉडेलचं कौतुक करताना नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता यावर जोर दिला.'' 
 

Web Title: Corona under control due to 800 RSS volunteers in Dharavi, photo sharing, chitra wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.