Join us

मुंबई शहरात कोरोना नियंत्रणात; उपनगरात बाधितांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 2:38 AM

चिंता वाढली : भांडुप, मुलुंड, बोरीवली, दहिसरमध्ये रूग्णवाढ

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई शहर भागातील वरळी, धारावी, वडाळा, भायखळा या विभागांत आता चित्र बदलले आहे. महापालिकेच्या ‘चेसिंग द व्हायरस’ या उपक्रमामुळे या विभागांमध्ये दररोज रुग्ण वाढण्याचा दर आता दोन टक्क्यांहून कमी आहे. मात्र शहर भागात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असताना पूर्व आणि पश्चिम उपनगरचे टोक म्हणजे अनुक्रमे भांडुप-मुलुंड आणि बोरीवली-दहिसर हे विभाग आता कोरोनाची केंद्रे बनण्याची भीती निर्माण झाली आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर वरळी परिसर हा पहिला हॉटस्पॉट बनला. या विभागातून प्रसार वाढत हळूहळू धारावी, भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा, वडाळा, सायन, अ‍ॅण्टॉप हिल अशा संपूर्ण दक्षिण व दक्षिण मध्य विभागांत पसरला. गेल्या दोन महिन्यांत महापालिकेने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण २४.५ दिवसांवर पोहोचले आहे. तसेच मुंबईत दररोज रुग्ण वाढण्याचा सरासरी दर २.८२ टक्के असताना या विभागांमध्ये हे प्रमाण दोन टक्क्यांहून कमी आहे.सुरुवातीपासूनच शहर भागात कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने दुर्लक्षित राहिलेल्या उपनगरातील टोकांच्या विभागात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. सर्वांत कमी लोकसंख्या असलेल्या मुलुंड विभागात दैनंदिन रुग्णवाढीचा दर ४.१ टक्के आहे. तर पश्चिम उपनगरात मालाडमध्ये ५.६ टक्के आणि मुंबईतील सर्वाधिक म्हणजे सहा टक्के दर दहिसर विभागात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अन्य विभागांमध्ये सुधारणा होत असताना दहिसर विभागात रुग्णवाढ होत आहे़टॉप विभाग (रुग्णवाढ सरासरीहून कमी)विभाग रुग्ण डिस्चार्ज रुग्णवाढदिवसाची (% मध्ये)ई (भायखळा, नागपाडा) ३०२९ १५८४ १.५एफ/उत्तर(सायन, वडाळा) ३०४५ १४८२ १.४जी उत्तर (धारावी, माहीम) ३६१८ २१८८ १.५जी/दक्षिण(वरळी, प्रभादेवी) २५४८ १४०७ १.९विभाग रुग्ण डिस्चार्ज रुग्णवाढदिवसाची (% मध्ये)पी उत्तर (मालाड) २४६९ ७२७ ५.६आर/दक्षिण(कांदिवली) १६५१ ७८४ ४.३आर मध्य बोरीवली १३३० ३९६ ४.३आर उत्तर (दहिसर) ७५८ १९९ ६एस भांडुप २५३६ ७२७ ४.४टी मुलुंड ११९९ ५०२ ४.१

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या