Join us

राज्यात १० लाख ८० हजार लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:08 AM

मुंबई : राज्यात आतापर्यंत १० लाख ८० हजार ६७५ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले आहे. दिवसभरात पार पडलेल्या ८१७ ...

मुंबई : राज्यात आतापर्यंत १० लाख ८० हजार ६७५ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले आहे. दिवसभरात पार पडलेल्या ८१७ व्या लसीकरण सत्रात ५१ हजार ३१५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २९ हजार १५६ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे व २२ हजार १५९ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ४९ हजार ९९३ लाभार्थ्यांना कोविशिल्ड व १ हजार ३२२ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण कऱण्यात आले आहे.

राज्यात मुंबईत आतापर्यंत १,९४,२०७ लाभार्थ्यांनी तर पुण्यात १,०८,०५५ लाभार्थ्यांनी कोरोना लस घेतली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्याखालोखाल ठाण्यात ९७,२१८, नागपूर ५०,६७९, नाशिक ४५,४००, सातारा ४१,२४७ लाभार्थ्यांनी कोविड लस घेतली आहे. दरम्यान, आतापर्यंत १,०२,२६४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.