राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:09 AM2021-02-17T04:09:28+5:302021-02-17T04:09:28+5:30
मुंबई : राज्यात मंगळवारी आयोजित ६५५ लसीकरण सत्रांत एकूण २७,६९८ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २३,२६१ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे ...
मुंबई : राज्यात मंगळवारी आयोजित ६५५ लसीकरण सत्रांत एकूण २७,६९८ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २३,२६१ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे व ४,४३७ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ७,८८४ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना व १५,३७७ फ्रंटलाइन लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले.
राज्यात ४,४३७ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. २७,३२४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली आहे. त्यापैकी २२,९४९ लाभार्थ्यांना पहिला डोस व ४,३७५ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ३७४ लाभार्थ्यांना कोवॅक्सिनचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी, ३१२ लाभार्थ्यांना पहिला डोस व ६२ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. आजपर्यंत एकूण ७,४१,३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आतापर्यंत एकूण १ लाख २० हजार ५०१ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याखालोखाल ठाण्यात ७१ हजार ५०३, पुण्यात ६९ हजार १५६, नाशिक ३३ हजार ४७५ आणि नागपूरमध्ये ३२ हजार ६५५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर याखेरीज, राज्यात दुसऱ्यांदा डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या ९ हजार ११६ आहे, यात सर्वाधिक प्रमाण पुण्यात असून, लाभार्थ्यांची संख्या ९४२ आहे. त्यानंतर ठाण्यात ८४५, नागपूर ६७७ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.