कोरोना लसीकरण शीतगृहाचे काम लवकरच हाेणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:06 AM2020-12-06T04:06:29+5:302020-12-06T04:06:29+5:30

कांजूरमार्ग येथे व्यवस्था : जानेवारी २०२१ अखेरचा मुहूर्त लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेनावरील प्रभावी लस अद्याप जगात कुठेही ...

Corona vaccination cold storage work to be completed soon | कोरोना लसीकरण शीतगृहाचे काम लवकरच हाेणार पूर्ण

कोरोना लसीकरण शीतगृहाचे काम लवकरच हाेणार पूर्ण

Next

कांजूरमार्ग येथे व्यवस्था : जानेवारी २०२१ अखेरचा मुहूर्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेराेनावरील प्रभावी लस अद्याप जगात कुठेही सापडलेली नाही. सर्वसामान्यांना ही लस मिळेपर्यंत २०२१ उजाडेल, असे समजते. मात्र, या लसीचा साठा करण्यासाठी मुंबई महापालिकेने कांजूरमार्ग, पूर्व येथे जागा निश्चित केली असून येथील शीतगृहाचे काम जानेवारी २०२१ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

कांजूरमार्ग परिवार संकुलात कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी अत्याधुनिक शीतगृह तयार करण्यात येत आहे. पाच माळ्यांपैकी तीन माळे हे शीतगृह केंद्रासाठी आहेत. बाहेरील वातावरणाचा लसींवर परिणाम होऊ नये यासाठी २ डिग्री सेल्सिअस ते ८ डिग्री सेल्सिअस तापमान ठेवणारी ४० क्युबिक मीटरची उपकरणे बसविण्यात येतील. सोबतच १५ डिग्री सेल्सिअस ते २५ डिग्री सेल्सिअस तापमान ठेवणारे २० क्युबिक मीटरचे उपकरणही बसविण्यात येईल. शीतगृह सकाळी सौरऊर्जेवर, रात्री थेट वीजपुरवठ्यावर सुरू राहील. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास प्रत्येक युनिटनिहाय स्वतंत्र डीजे सेटची व्यवस्था करण्यात येणार आहे.

.................................

Web Title: Corona vaccination cold storage work to be completed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.