राज्यात दिवसभरात २४ हजार २८२ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:07 AM2021-01-25T04:07:41+5:302021-01-25T04:07:41+5:30
राज्यात दिवसभरात २४,२८२ कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण आतापर्यंत सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना लस : गाेंदिया जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद लोकमत न्यूज ...
राज्यात दिवसभरात २४,२८२ कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण
आतापर्यंत सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना लस : गाेंदिया जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शनिवारी २९० केंद्रांवर २४ हजार २८२ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाचे प्रमाण ८३ टक्के आहे. दिवसभरात सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्यात १४३ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ गडचिरोली, वर्धा, अमरावती, जालना, बीड, धुळे, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ९९ हजार २४२ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात शनिवारी २९७ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण १५७२ जणांना ही लस देण्यात आली.
* लसीकरणाची आकडेवारी (कंसात दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी, टक्के आणि आतापर्यंतची एकूण संख्या) :
अकोला (२५८, ८६ टक्के, ११०६), अमरावती (५७५, ११५ टक्के, २३८६), बुलडाणा (४६९, ७८ टक्के, २११७), वाशिम (२३३, ७८ टक्के, ११३१), यवतमाळ (३२९, ७३ टक्के, १७८८), औरंगाबाद (९३६, ७२ टक्के, ३१३७), हिंगोली (२०८, १०४ टक्के, ९७६), जालना (४५२, ११३ टक्के, १६८५), परभणी (१७३, ४३ टक्के, १३२२), कोल्हापूर (८४८, ७७ टक्के, ३५०४), रत्नागिरी (३४१, ६८ टक्के, १४५५), सांगली (८७१, ९७ टक्के, २७३९), सिंधुदुर्ग (२१०, ७० टक्के, ९१०), बीड (५५४, १११ टक्के, २२६२), लातूर (५९५, ९९ टक्के, २१०७), नांदेड (५२०, १०४ टक्के, १६७७), उस्मानाबाद (३०१, १०० टक्के, १३०१), मुंबई (१४८४, ९३ टक्के, ४७६६), मुंबई उपनगर (२०३३, ७० टक्के, ७३९३), भंडारा (२६३, ८८ टक्के, १२३८), चंद्रपूर ( ४७६, ७९ टक्के, २१७७), गडचिरोली (५४२, १३६ टक्के, १५७०), गोंदिया (४२८, १४३ टक्के, १२६७), नागपूर (१०५६, ८८ टक्के, ४७६७), वर्धा (७१५, ११९ टक्के, २६४५), अहमदनगर (८७०, ७३ टक्के, ३९०६), धुळे (४३५, १०९ टक्के, १८९१), जळगाव (६६४, ८६ टक्के, २५७०), नंदुरबार (३०८, ७७ टक्के, १४७५), नाशिक (७३३, ५६ टक्के, ४०३६), पुणे (१८५३, ६० टक्के, ८२५१), सातारा (७७२, ८६ टक्के, ३४७२), सोलापूर (१०८२. ९८ टक्के, ४६०३), पालघर (३१४, ७९ टक्के,१५९०), ठाणे (२२०१, ९६ टक्के, ९०४०), रायगड (१८०, ४५ टक्के, ९८२)
* पाच दिवस होणार लसीकरण
सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र घेण्यात येईल. ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.
.....................