मुंबई - मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर आजपासून देशातील अन्य भागांसह मुंबईत कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पहिल्या दिवशीचे लसीकरण सुरळीत पार पडल्यानंतर या लसीकरणाच्या मोहिमेत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे रविवारी मुंबई आणि राज्यात होणारे कोरोनाविरोधातील लसीकरण बंद राहणार आहे. तसेच सोमवारीही लसीकरण होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना लसीकरणाची नोंदणी ठेवणाऱ्या को-विनअॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण रद्द करण्यात आले आहे. कोरोनाविरोधातील लसीकरणाची नोंदणी ठेवणारे को-विन हे अॅप डाऊन झाले आहे. तसेच लसीकरणाच्या ऑफलाइन नोंदणीस सध्या मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे या तांत्रिक बिघाडामुळे रविवारी आणि सोमवारी होणारी लसीकरणाची मोहीम रद्द करावी लागली आहे.
मोठी बातमी : ...त्यामुळे पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यात होणार नाही कोरोना लसीकरण
By बाळकृष्ण परब | Published: January 16, 2021 10:09 PM
Corona vaccination Update : आजपासून देशातील अन्य भागांसह मुंबईत कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पहिल्या दिवशीचे लसीकरण सुरळीत पार पडल्यानंतर या लसीकरणाच्या मोहिमेत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत.
ठळक मुद्देरविवारी मुंबई आणि राज्यात होणारे कोरोनाविरोधातील लसीकरण राहणार बंद कोरोना लसीकरणाची नोंदणी ठेवणाऱ्या को-विनअॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण रद्द करण्यात आले आहेकोरोनाविरोधातील लसीकरणाची नोंदणी ठेवणारे को-विन हे अॅप डाऊन झाले आहे