Corona Vaccination: घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत न्यायालयानं केंद्राकडे मागितलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 03:20 AM2021-04-08T03:20:34+5:302021-04-08T07:35:03+5:30

लसीकरणासाठी नोंद करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे शक्य आहे का? असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केंद्राला केला.

Corona Vaccination: Court seeks reply from Center on door-to-door vaccination | Corona Vaccination: घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत न्यायालयानं केंद्राकडे मागितलं उत्तर

Corona Vaccination: घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत न्यायालयानं केंद्राकडे मागितलं उत्तर

Next

मुंबई : ज्येष्ठ नागरिक, अपंग व अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तिंसाठी घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर केंद्र सरकरला उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले.

लसीकरणासाठी नोंद करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे शक्य आहे का? असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केंद्राला केला.

अपंग, अंथरुणावर खिळलेल्या व ७५ वर्षांवरील व्यक्तिंना घरी जाऊन लस द्यावी, असे निर्देश केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले धृती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केली.
माझे वडील व्हीलचेअरवर असल्याने त्यांना लस देण्यासाठी मला नेता येत नाही, असे न्या. कुलकर्णी म्हणाले. अशी अनेक लोक असतील.  त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर जाताही येत नसेल, असे न्यायालयाने नमूद केले.

लसीकरण केंद्रावर आयसीयू असणे गरजचे
उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय बैठकीत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल हेदेखील उपस्थित होते. काेराेनाची सध्यस्थिती पाहता तसेच लसीकरण माेहीम लक्षात घेता लसीकरण केंद्रावर आयसीयू उपलब्ध असणे आवश्यक आहे. 
कारण एखाद्याला लसचा त्रास झाला तर त्याला तत्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी आयसीयू आवश्यक आहे, असे मत नोंदवत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ९ एप्रिल रोजी ठेवली.
 

Web Title: Corona Vaccination: Court seeks reply from Center on door-to-door vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.