Corona vaccination : स्त्री आधार केंद्राच्यावतीने चेंबूर येथील २५६ कष्टकरी आणि गरजू महिलांचे मोफत लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:12 PM2021-09-04T20:12:33+5:302021-09-04T20:12:33+5:30
Corona vaccination in Mumbai: स्त्री आधार केंद्र, पुणे ह्यांच्या पुढाकाराने आणि कोरो इंडिया, मुंबई ह्यांच्या सहयोगाने चेंबूर येथील कष्टकरी आणि गरजू महिलांसाठी कोरोना लसीकरण आज दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी अपोलो हॉस्पिटल स्पेक्ट्रा, चेंबूर येथे सकाळी संपन्न झाले.
मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या संक्रमणाचा वेग थोड्या प्रमाणात जास्त होता. यांचा धागा पकडत स्त्री आधार केंद्र, पुणे ह्यांच्या पुढाकाराने आणि कोरो इंडिया, मुंबई ह्यांच्या सहयोगाने चेंबूर येथील कष्टकरी आणि गरजू महिलांसाठी कोरोना लसीकरण आज दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी अपोलो हॉस्पिटल स्पेक्ट्रा, चेंबूर येथे सकाळी संपन्न झाले. यावेळी अपोलो हॉस्पिटलचा परिसर महिलांच्या चेहऱ्यावरील आनंदाने दरवाळून निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या लसीकरणाचे शुभारंभ विधानपरिषद उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्ष ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले.स्वतःच्या सामाजिक दुरीकरणाबरोबर आज या महिलांनी कोरोनाच्या मुक्तीसाठी पाहिले पाऊल टाकले अशी भावना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली.
‘जेथे कमी तेथे आम्ही’अशा विचारावर चालणारी स्त्री आधार केंद्र संस्था आहे. कष्टकरी व गरजू महिलांसाठी लसीकरण प्रकल्प राबविण्यात येत असून पुणे येथील चाकण-आळंदी, औरंगाबाद औद्योगिक क्षेत्र येथे देखील लसीकरण घेण्यात येणार असून आज घेतलेल्या महिलांचे लसीकरण वेळेत पूर्ण केले जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे चेंबुर भागात विविध विषयांवर अनेक परिषदा, पोलिसांच्या संवेदनशीलतेसाठी अनेक उपक्रम स्त्री आधार केंद्राने राबविले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांचे सर्व्हे देखील सुरू असून यासंदर्भात अहवाल विविध संस्था तसेच शासनास सादर करणार असल्याचे देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून समाजातील गरीब घटकांना सुद्धा चांगल्याप्रकारची व्यवस्था असलेले लसीकरण मिळावे हा स्त्री आधार केंद्राचा हेतू होता असे संस्थेच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी सांगितले. हे लसीकरण रामकृष्ण बजाज चॅरिटेबल ट्रस्ट व आय.एम.सी सेंच्युरी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमान् व स्त्री आधार केंद्र पुणे ह्यांच्या पुढाकाराने आणि कोरो इंडिया मुंबई ह्यांच्या सहयोगाने, आयोजित करण्यात आले होते. एकूणच कोरोनामुळे सगळ्यात जास्त त्रास सोसाव लागला तो हातावरील पोट असलेल्या समूहाला, त्यातही महिला जास्त भरडल्या गेल्या आणि लसीकरणाचेहि तेच होऊ नये म्हणून स्त्री आधार केंद्राने हा पुढाकार घेतला.एकाच दिवशी २५० महिलांचे मोफत लसीकरण करण्यात आले . कोरो ही संस्था प्रामुख्याने तळातील लोकांसाठी काम करणारी संस्था असल्याचे सुप्रिया सोनार यांनी सांगितले.
ह्या कार्यक्रमाच्या वेळी उद्घाटन डॉ.गोऱ्हे उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य, विशवस्त जेहलम जोशी, शिवसेना विभागप्रमुख मंगेश सातमकर, माजी आमदार तुकाराम काते, नगरसेविका समृद्धी काते, अपोलो हॉस्पिटलचे विभागीय प्रमुख असफाक शेख, मेनेजर श्री संजोय सामंता तसेच स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे, आश्लेषा खंडागळे, कोरो राईट टू पी टीमच्या रोहिणी कदम, अंजुम शेख, उषा देशमुख, मनोज साबळे, किरण खंडेराव, रेहना शेख व पत्रकार संजय जोग यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.